कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर चर्चा
अभिजीत दीपके यांची नवी मोहीम
बेरोजगारीवर व्यंगात्मक आंदोलन
इंटरनेटवर ट्रेंड झाली राजकीय चळवळ
सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हटलं आणि देशात एका नव्या पक्षाचा जन्म झाला. या पक्षानं सोशल मीडियावर चार दिवसांत ५० लाखांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली आहे. कोणता आहे हा पक्ष? हा पक्ष सुरू कऱणारा मराठी तरुण कोण आहे? पाहूया एक खास रिपोर्ट...
सध्या महागाई, इंधन टंचाईने सामान्य जनता त्रस्त असतानाच सोशल मीडियावर एका अनोख्या 'राजकीय पक्षा'ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी. आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ता अभिजीत दिपके यांनी व्यंगात्मक पद्धतीने या पक्षाची कल्पना मांडली. आणि अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर 5 मिलीयन पेक्षा जास्त लोक या मोहिमेशी जोडले गेले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी "काही बेरोजगार युवक म्हणजे झुरळ आहेत, अशी टिप्पणी केली होती. त्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटल्यात. आणि त्यालाच उत्तर म्हणून 'हा मैं भी कॉक्रोच...' हे रॅप साँगही तयार करण्यात आलंय.
उपहास म्हणून या मोहिमेची सुरुवात झाली होती. पण आता तो इंटरनेटवर ट्रेंड बनलेला दिसतो. आळशी, बेरोजगार लोकांचा आवाज अशा टॅगने या पक्षाची वेबसाईट देखील आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद देखील या पक्षाचे सदस्य झालेत. आम्ही लोकांना राजकीयदृष्ट्या सतर्क बनवू, संघटीत करु, असे अभिजीत दिपके यांनी म्हटलंय.
भारतीय राजकारणात एखाद्या पक्षांची स्थापना होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र ही संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर सुरू झाली आणि इंटरनेटवर वेगाने पसरली. 'हे सिर्फ कम्प्लेंट नही मुव्हमेंट है, आवाज उठाओ, सिस्टिम बदलो' असं आवाहन केलं जातंय. मात्र आमचे प्लॅटफॉर्म हॅक केले जातायेत, असं सांगून दिपकेने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके यानं पुण्यातून पत्रकारितेत पदवी घेतली. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क विषयात मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केले आहे. अभिजीतनं काही काळ आपच्या सोशल मीडियासाठीही काम केले आहे.
भ्रष्टाचार, शिक्षण घोटाळा, आरोग्य, बेरोजगारी, राजकारण यावर हा पक्ष बोलणार आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहे. सोशल मीडियावर सुरु झालेली ही चळवळ पुढे कसं व्यापक रुप घेते ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.