Dhanshri Shintre
उष्णता आणि आर्द्रतेमुळे झुरळांसाठी योग्य वातावरण तयार होते आणि स्वयंपाकघर त्यांचे आवडते ठिकाण बनते.
अन्न, पाणी आणि सुरक्षित आश्रय मिळाल्याने झुरळे घरातील ओले आणि लपलेले कोपरे पटकन व्यापतात.
अनेकजण रासायनिक फवारण्या किंवा महागडे कीटकनियंत्रण वापरतात, पण झुरळांना दूर ठेवण्यासाठी सोपे नैसर्गिक उपायही उपलब्ध आहेत.
१०-१२ कापूरच्या गोळ्या,२-३ चमचे गूळ, ५-६ गोळे नॅप्थालीन गोळे, बोरिक पावडर, फ्लोअर क्लीनर, कापसाचे गोळे.
स्वच्छ डब्यात कापूर, नॅप्थालीनच्या गोळ्या आणि गूळ एकत्र करून बारीक पावडर तयार करा.
त्या पावडरमध्ये बोरिक पावडर आणि फ्लोअर क्लीनर मिसळून पेस्टसारखी घट्ट सुसंगतता तयार करा.
कापसाचे गोळे मिश्रणात नीट बुडवा, जोपर्यंत ते पूर्णपणे भिजत नाहीत.
ओले कापसाचे गोळे झुरळांच्या लपण्याच्या जागी ठेवा, त्यांच्या वासामुळे झुरळे पटकन मरुन पडतील.