Dhanshri Shintre
झुरळांपासून सुटका हवी असेल, तर सिंक आणि कोपऱ्यांमध्ये कापूर ठेवल्याने त्यांना दूर ठेवता येते.
कापूरचा तीव्र वास झुरळांना सहन होत नाही, त्यामुळे घरात कापूर ठेवल्यावर त्याचा वास झुरळांना दूर पळवतो, असं मानलं जातं.
कापूरचा वापर झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करू शकता. त्यासोबत धूप जाळून किचन आणि सिंकजवळ वास पसरवल्यास झुरळ दूर होतात.
झुरळांपासून मुक्ती हवी असल्यास कापूरचा स्प्रे तयार करा आणि झुरळ लपलेल्या कोपऱ्यांमध्ये तो स्प्रे केल्याने त्यांना दूर ठेवता येते.
झुरळ दूर करण्यासाठी कापूरमध्ये कडुलिंब किंवा लसूण मिसळून पेस्ट तयार करा आणि ती किचन व सिंकच्या आजूबाजूला लावा.
झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी कापूर आणि काळी मिरी एकत्र करून स्प्रे तयार करा आणि झुरळ लपलेल्या ठिकाणी तो स्प्रे करा.
झुरळांना दूर ठेवण्यासाठी कापूर आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिश्रण तयार करा आणि ते सिंकजवळ किंवा झुरळ येणाऱ्या ठिकाणी ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.