Dhanshri Shintre
उन्हाळ्यात अन्न खराब होऊ नये यासाठी काही सोपे उपाय आणि टिप्स फॉलो करा आणि जेवण ताजं ठेवा.
दुपारच्या टिफिनमध्ये कोरड्या व टिकाऊ पदार्थांचा समावेश करा, जसे पराठे, डाळ-भात, सुक्या भाज्या किंवा सँडविचेस.
ऑफिस किंवा शाळेत फ्रिजची सुविधा असल्यास, ताजेपणा टिकवण्यासाठी तुमचा टिफिन त्यात ठेवणे अधिक योग्य ठरेल.
उन्हाळ्यात अन्न ताजे ठेवण्यासाठी इन्सुलेटेड आणि एअरटाईट लंच बॉक्सचा वापर करणे फायदेशीर ठरतो.
चपाती, पराठा किंवा सँडविच अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळल्यास ते मऊ राहतात आणि कोरडे पडत नाहीत.
उन्हाळ्यात मसालेदार अन्न टाळा, कारण ते शरीराचं तापमान वाढवते आणि अन्न लवकर खराब होण्याचा धोका असतो.
दैनंदिन आहारात सौम्य मसाले वापरून बनवलेल्या भाज्या आणि डाळी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात.
जेवण शिजवल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्या, त्यामुळे त्यातील उष्णता कमी होईल आणि डब्यात भरता येईल.
उन्हाळ्यात शिळे अन्न ऑफिस किंवा शाळेत नेणे टाळा, कारण ते लवकर खराब होऊ शकते आणि शरीरावर परिणाम होऊ शकतो.