Switzerland Crans Montana Bar Explosion Saam Tv
देश विदेश

Shocking: नवीन वर्षाचे स्वागत करताना बारमध्ये भीषण स्फोट, किंकाळ्या अन् आगीच्या ज्वाळा; अनेकांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Switzerland Crans Montana Bar Explosion: स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर पार्टीदरम्यान भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. एका बारमध्ये हा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. आगीमध्ये होरपळून अनेकांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary:

  • स्वित्झर्लंडमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली

  • न्यू इयरची पार्टी सुरू असताना बारमध्ये अचानक स्फोट झाला

  • स्फोटानंतर बारला भीषण आग लागली

  • या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध क्रांस मोंटना स्की रिसॉर्टमध्ये न्यू इअरचे सेलिब्रेशन करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर बारला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत बार पूर्णपणे जळून खाक झाला.

स्वित्झर्लंड पोलिसांनी सांगितले की, हा स्फोट स्वित्झर्लंड शहरातील क्रॅन्स-मोंटाना येथील स्की रिसॉर्टमध्ये झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यू इअरचे सेलिब्रेशन करत असताना बारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर बारमध्ये भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये अनेक जण अडकले होते. स्वित्झर्लंड पोलिसांच्या बचाव पथकांनी त्यांना बारमधून बाहेर काढले. जखमी झालेल्या या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. ही स्फोटाची घटना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. हा स्फोट कॉन्स्टेलेशन बारमध्ये झाला. या बारमध्ये मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. या स्फोटामुळे बारचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, या बारमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. क्रॅन्स मोंटाना येथील आलिशान अल्पाइन स्की रिसॉर्टमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिस या स्फोटामागचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर बार असलेली बिल्डिंग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. या स्फोटाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून स्फोटाची भीषणता दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा विजयरथ सुसाट! मतदानाआधीच आणखी एका महापालिकेत पारडं झालं जड, नेमकं काय राजकारण घडलं?

Crime: लग्नाचं खोटं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, पोलिसाचं हैवानी कृत्य

Chavali Bhaji Recipe: अस्सल गावरान पद्धतीची चवळीची भाजी कशी बनवायची?

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला; शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल, ३ नगरसेवक बिनविरोध

Dementia Symptoms : मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं

SCROLL FOR NEXT