कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटने जगाची वाढवली चिंता; लसही परिणामकारक नाही! Saam Tv
देश विदेश

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटने जगाची वाढवली चिंता; लसही परिणामकारक नाही!

जगभरात मागील २ वर्षापासून कोरोना महामारीने मोठे थैमान घातले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जगभरात मागील २ वर्षापासून कोरोना Corona महामारीने मोठे थैमान घातले आहे. या महामारीत फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देशांना नियंत्रण Control मिळवण्यात यश आले आहे. भारतात India आतापर्यंत कोरोनाच्या २ लाटा आले आहेत. वैज्ञानिकांनी scientists पुढील काळात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यातच आता कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटमुळे Variant जगाचे मोठे टेन्शन परत वाढवले आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस Delta Plus व्हेरियंटनंतर आता C १.२ हा नविन व्हेरियंट वैज्ञानिकांना अभ्यासामधून सापडला आहे. C १.२ हा कोरोनाचा प्रकार पहिल्यांदा यावर्षी मे महिन्यात सापडला आहे. हा नविन व्हेरियंट सर्वप्रथम चीन China, कांगो, इंग्लंड, माॅरिशस, स्वित्झर्लंड Switzerland आणि पोर्तुगालमध्ये Portugal कोरोनाबाधित रूग्णांच्या घेण्यात आलेल्या सँपलमध्ये सापडला आहे.

हे देखील पहा-

मात्र, हा विषाणु पुन्हा ऑगस्टमध्ये सर्वत्र सापडल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इंस्टिट्यूट फाॅर कम्यूनिकेबल डिसिजेस South Africa's National Institute for Communicable Diseases आणि क्वाझूलु नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वन्सिंग प्लटफाँर्मच्याच्या सुक्ष्मजीव अभ्यासकांनी याची नवी माहिती समोर आणलेली आहे.

मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळेस आलेला प्रकारामध्ये C १.२ अधिक प्रसारित होत असल्याचे दिसून आल्याचे संशोधकांनी यावेळी सांगितले आहे. सीएसआयआर CSIR कोलकाताचे Kolkata शास्त्रज्ञ राॅय यांच्या म्हण्यानुसार, C १.२ हा नविन विषाणू अधिक वेगाने संसर्गित होणारा आहे. त्यामुळे रूग्णाच्या शरिरात रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात राहणार नाही. यामुळे जगभरात कोरोनाच्या लसीकरणाचे vaccination परत एकदा आव्हान तयार होणार आहे. यामुळे हा नवा व्हेरियंट किती मोठ्या प्रमाणात घातक ठरणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT