New Vande Bharat Train Saam Tv
देश विदेश

New Vande Bharat Express : नव्या वंदे एक्सप्रेसची घोषणा; कुठून कुठे धावणार? वाचा वेळापत्रक

New Vande Bharat Train Launch: रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेने नवीन वंदे भारत ट्रेन सुरु केली आहे. या ट्रेनमुळे गुजरात आणि राजस्थान शहर जोडले जाणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेचा मोठा निर्णय

नवीन वंदे भारत ट्रेन सुरु

दोन वंदे भारत ट्रेन बंद करण्याचा निर्णय

रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाची घोषणा केल आहे. देशात आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरु केली जाणार आहे. एक ट्रेन सुरु होत असली तरीही सध्याच्या दोन ट्रेन बंद केल्या जाणार आहेत. याच आठवड्यात दोन वंदे भारत ट्रेन बंद होणार आहे.

नवीन वंदे भारत ट्रेन (Vande Bharat New Train Launch)

नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही थेट राजस्थान गुजरात या दोन राज्यांना जोडणार आहे. नवीन सेमी हाय स्पीड ट्रेन उदयपुर ते असरवा (अहमदाबाद) अशी धावणार आहे.या ट्रेनमुळे थेट राजस्थानवरुन अहमदाबाद गाठला येणार आहे. यामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढेल. याचसोबत अर्थव्यवस्था वाढण्यात मदत होईल. एनडब्ल्यूआरने उदयपुर सिटी ते असरवा वंदे भारतची घोषणा केली आहे.

नवीन ट्रेनचे वेळापत्रक (Vande Bharat Udaipur City to Asarva ahmedabad Train)

उदयपुर सिटी-असरवा (अहमदाबाद)- उदयपुर सिटी ट्रेन मंगळवार सोडून आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन सकाळी ६.१० वाजता उदयपुर सिटी येथून निघणार आहे. ट्रेन १०.२५ मिनिटांनी असरवा येथे पोहचणार आहे. हीच ट्रेन परत असरवा येथून संध्याकाळी ५.४५ वाजता निघणार आहे. ही ट्रेन रात्री १० वाजता पोहचणार आहे. ट्रेन जवार, डुंगारपुर, हिम्मत नगर स्टेशनवर थांबणार आहे. ही ट्रेन १६० किमी ताशी धावणार आहे.

नवीन सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास आरामदायी होणार आहे. प्रवाशांना राजस्थानवरुन थेट अहमदाबादला जाता येणार आहे. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. याचसोबत प्रवासाचा वेळदेखील वाचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

SCROLL FOR NEXT