Toll pass : झंझट संपणार! १५ वर्षांपर्यंत टोलपासून सुटका होणार, कुठेही जा FASTag रिचार्जची गरज नाही, सरकारचा प्लॅन काय? 
देश विदेश

Toll pass : झंझट संपणार! १५ वर्षांपर्यंत टोलपासून सुटका होणार, कुठेही जा FASTag रिचार्जची गरज नाही, सरकारचा प्लॅन काय?

Annual and Lifetime Toll pass : केंद्र सरकार वार्षिक आणि लाईफटाईम टोल पासची योजना आणायच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक टोलची किंमत ३ हजार रूपये तर लाईफटाईम टोलची किंमत ३० हजार रूपये इतकी असू शकते. यावर केंद्र सरकार काम करत आहे.

Namdeo Kumbhar

Annual and Lifetime pass New Toll System : कामानिमित्त अथवा फिरण्यासाठी घराबाहेर पडल्यावर एक्सप्रेस वे अथवा महामार्गावर टोल टॅक्स द्यावा लागतो. पण अनेकदा फास्टॅग रिचार्ज न केल्यामुळे रांगेत टोल भरावा लागतो, त्यामुळे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होते, अन् मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. फास्टॅगवरून टोल देणाऱ्यांनाही वारंवार रिचार्ज करावा लागतो. त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता यातून कायमची सुटका होणार आहे, कारण सरकार टोलसाठी वार्षिक आणि लाईफटाईम पास काढण्याच्या तयारीत आहे. त्यावर सरकारी यंत्रणाकडून काम सुरू करण्यात आले आहे.

केंद्र सरकार खासगी वाहनांसाठी वार्षिक आणि लाईफटाईम टोल पासची योजना आणायच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक टोलची किंमत ३ हजार रूपये तर लाईफटाईम टोलची किंमत ३० हजार रूपये इतकी असू शकते. यावर केंद्र सरकार काम करत आहे. वार्षिक टोल पासची योजना आल्यानंतर FASTag वर वारंवार रिचार्च करण्याची गरज लागणार नाही, पाहूयात नेमकी योजना आहे तरी काय?

टॅक्सपासून मिळणार सुटका ?

राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वे वरून जाताना खासगी वाहनधारकांना टोल भरणं अधिक सोपं करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. वार्षिक आणि लाईफटाईम टोल पासचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. नेहमीच राष्ट्रीय महामार्ग अथवा एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. एकदा पैसे भरल्यानंतर वर्षभर अथवा आयुष्यभर टॅक्सपासून सूट मिळणार आहे.

वार्षिक आणि आयुष्यभराचा पास किती रूपयांना?

रिपोर्ट्सनुसार, सरकारने वार्षिक टोल पासची किंमत ३ हजार रूपये इतकी ठरवली आहे. तर १५ वर्षांचा लाईफटाईम पासची किंमत ३० हजार रूपये ठरवण्यात आली आहे. या पासमुळे वर्षभर अथवा १५ वर्षे राष्ट्रीय महामार्ग अन् एक्सप्रेस वे वरून प्रवास करता येणार आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा पास फायद्याचा ठरणार आहे. वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

ही सिस्टम कसं काम करणार ?

हे नवीन सिस्टम FASTag सोबत जोडण्यात येईल. म्हणजेच, जर तुम्हाला वार्षिक अथवा लाईफटाईम पास घ्यायचा असेल तर वेगळं कार्ड खरेदी कऱण्याची गरज नाही. FASTag वरूनच तुम्ही पास खरेदी करू शकता. तुम्ही जेव्हा टोल नाक्यावरून जाल, त्यावेळी आपोआप पैसे कट होतील.

फायदे काय ?

वारंवार रिचार्च करण्याची झंझट संपणार

वेळ आणि पैसा वाचणार

वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज नाही.

टोल भरण्याची प्रक्रिया अधीक सोपी होणार

सध्या खासगी वाहनांना प्रतिमहिना ३४० रूपये अथवा वार्षिक ४ हजार ८० रूपयांचा पास मिळतो. पण हा पास फक्त एकाच टोल प्लाजावर वापरता येतो. ३ हजार रूपयांचा वर्षाचा पास घेतल्यास देशभरातली कोणत्याही हायवे अथवा एक्सप्रेसवर अमर्याद प्रवास करता येणार आहे. मासिक पासच्या तुलनेत हा अधिक फायद्याचा आणि स्वस्त असेल, असे दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT