Afghanistan : तालिबानचे नवीन सरकार गठीत, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी
Afghanistan : तालिबानचे नवीन सरकार गठीत, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी Saam Tv
देश विदेश

Afghanistan : तालिबानचे नवीन सरकार गठीत, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अफगाणिस्तानमध्ये नवीन तालिबान सरकारच्या स्थापनेला सुरुवात झाली आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद Mohammad Hasan Akhund यांना अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. याबरोबरच अब्दुल गनी बरदार Abdul Ghani Baradar यांना उपपंतप्रधान घोषित करण्यात आले आहे. तर खैरउल्लाह खैरख्वा यांच्याकडे माहिती मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे

माव्लावी हन्नाफी यांना दुसरे उपनेते बनवण्यात आले आहे. तर मुल्ला याकूब यांना संरक्षण मंत्रालय आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्याकडे अंतर्गत व्यवहार मंत्रालय देण्यात आले आहे. तसेच अब्दुल हकीम यांना न्याय मंत्रालय पद देण्यात आले आहे. तर शेर अब्बास स्टेनिकझाई यांच्याकडे उपपरराष्ट्र मंत्र्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मागील काही दिवसांपासून अफगाणिस्थान मध्ये तालिबानचे नवीन सरकार स्थापन होणार अशी चर्चा सुरू होती. लवकरच तालिबान सत्ता स्थापन करणार असे तर्कवितर्क देखील लावण्यात येत होते. शेवटी तालिबानने सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. २० वर्षांनंतर तालिबान परत एकदा अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यात मोठे यश मिळवले आहे.

अफगाणिस्तानमध्ये १९९६ ते २००१ पर्यंत तालिबानची सत्ता होती. अमेरिकेत ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तालिबानचे वाईट दिवस सुरू झाले होते. अमेरिकेने हल्ला करून, तालिबान्यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले होते. अमेरिकेचे सैन्य २० वर्षे अफगाणिस्तान मध्ये राहिले होते. परंतु, २०१८ पासून अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नांवर तालिबानशी चर्चा सुरू करण्यात ३१ ऑगस्ट दिवशी अमेरिकन सैन्याने अमेरिका पूर्णपणे सोडली होती.

यानंतर तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळण्याकरिता काही महिने लागणार अशी अपेक्षा होती. परंतु, तालिबानने १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत राजधानी काबूलवर ताबा मिळवला होता. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी याना देश सोडून पळून जावे लागले होते. तालिबानने जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे. ज्या ठिकाणी तालिबान अद्याप पूर्णपणे पोहोचलेला नाही. या ठिकाणी तालिबानी बंडखोरांशी तालिबान सैन्याची लढाई सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

SCROLL FOR NEXT