इच्छामरणासाठी आलं नवं मशीन; 'या' देशाने दिली मंजुरी Saam Tv
देश विदेश

इच्छामरणासाठी आलं नवं मशीन; 'या' देशाने दिली मंजुरी

हे यंत्र एनजीओचे संचालक डॉ. फिलीश नित्शके यांनी तयार केले आहे.

वृत्तसंस्था

स्वित्झर्लंड - आधीपासूनच स्वित्झर्लंडमधील नागरिकांना इच्छामृत्यूला कायदेशीर परवानगी आहे.स्वित्झर्लंडने शवपेटीच्या आकाराच्या मशीनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. या मशीनच्या मदतीने एका मिनिटात कुठलाही त्रास न होता शांततापूर्ण मृत्यूला कवटाळू शकतील. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामृत्यू कायदेशीर असून गेल्या वर्षी सुमारे तेराशे लोकांनी इच्छामृत्यूसाठी एनजीओच्या सेवांचा वापर केला होता. हे यंत्र एनजीओचे संचालक डॉ. फिलीश नित्शके यांनी तयार केले आहे. आजारपणामुळे किंवा हालचाल करू शकत नसलेल्या रुग्णांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. वापरकर्त्याला हे मशीन त्याच्या पसंतीच्या ठिकाणी न्यावे लागेल.

हे देखील पहा -

नंतर मशीनचे डिग्रेडेबल कॅप्सूल वेगळे केले जातात जेणेकरून ते शवपेटी म्हणून वापरले जाऊ शकते. कोणतीही अनपेक्षित अडचण न आल्यास पुढील वर्षापर्यंत देशाला सारको मशीन उपलब्ध करून देऊ, अशी माहिती डॉ. फिलीश नित्शके यांनी दिली आहे. हा प्रकल्प आतापर्यंतचा खूप खर्चिक प्रकल्प होता पण आम्हाला खात्री आहे की आम्ही आता त्याच्या अंमलबजावणीच्या अगदी जवळ आलो आहोत असे देखील ते म्हणले.

तर दुसरीकडे लोक या डॉक्टर डेथवर जोरदार टीका करत आहेत. हे यंत्र आत्महत्येला प्रोत्साहन देते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. सध्या दोन सारको प्रोटोटाइप तयार करण्यात आले असून तिसरे मशीन पुढील वर्षी तयार होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

SCROLL FOR NEXT