Shreya Maskar
साउथ इंडियन स्टाइल फ्राईड राईस बनवण्यासाठी शिजवलेला भात, उडीद डाळ, हरभरा डाळ, शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता, लाल-हिरव्या मिरच्या, हिंग, आमचूर पावडर, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
साउथ इंडियन स्टाइल फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल टाकून त्यात हिंग, मोहरी तडतडू द्या.
यात उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालून भाजून घ्या.
त्यानंतर लाल मिरची आणि कढीपत्ता घाला.
मिश्रणात खरपूस भाजलेले शेंगदाणे टाका.
सर्व मिश्रण चांगले शिजल्यावर यात शिजवलेला भात टाकून एकजीव करा.
शेवटी यात मीठ आणि आमचूर पावडर घालून नीट मिक्स करा.
साउथ इंडियन स्टाइल फ्राईड राईसचा आस्वाद घेताना वरून हिरवीगार कोथिंबीर टाका.