Shreya Maskar
पावसाळ्यात मुलांच्या टिफिनसाठी खास चटपटीत पनीर पकोडा बनवा.
पनीर पकोडा बनवण्यासाठी पनीर, बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, ओवा, हिंग, मीठ, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, ओवा, हिंग आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या.
या मिश्रणात थोडे पाणी टाकून छान फेटून घ्या.
दुसरीकडे पनीरचे तुकडे करून तेलात फ्राय करा.
पनीर मधोमध कापून त्यात पुदिन्याची घट्ट चटणी भरा.
त्यानंतर पनीरचे तुकडे बेसनच्या मिश्रणात घोळवून तेलात खरपूस तळून घ्या.
गरमागरम पनीर पकोडे टोमॅटो सॉससोबत खा.