Shreya Maskar
मुलांचे आवडते चीज घरीच १० मिनिटांत बनवा.
चीज बनवण्यासाठी मैदा, बटर, दूध, किसलेले चीज, मीठ आणि मिरी पावडर इत्यादी साहित्य लागते.
चीज सॉस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये बटर वितळवून मैदा घालून चांगले मिक्स करा.
थोड्या वेळाने यात गरम दूध घालून सतत ढवळत राहा.
मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची खबरदारी घ्या.
सॉस थोडा घट्ट झाल्यावर त्यात किसलेले चीज, मीठ आणि मिरी पावडर घालून मिक्स करा.
चीज वितळेपर्यंत ढवळत राहा म्हणजे सॉस घट्ट होईल.
गरमागरम ब्रेडला चीज लावून आस्वाद घ्या.