New Justice Statue In SC Saam Tv
देश विदेश

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची एक मूर्ती बसवण्यात आली आहे, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही.

Satish Kengar

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात आलेल्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. पारंपारिक मूर्तीप्रमाणेच तिच्या एका हातात तराजू आहे, पण दुसऱ्या हातात तलवारीऐवजी भारताचे संविधान आहे.

प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेची नवीन मूर्ती न्याय आंधळा नसतो, असा स्पष्ट संदेश देत आहे. न्याय संविधानाच्या आधारे काम करतो. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने ही मूर्ती बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अशा आणखी मुर्त्या बसवणार की नाही, हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.

अलीकडेच भारतात नवीन कायदे बनवले गेले आहेत. ब्रिटिशांचे कायदे बदलले जात आहेत. केंद्र सरकारने अनेक जुने कायदे बदलले किंवा रद्द केले आहेत. आता भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशकालीन परंपरा मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

का हटवण्यात आली पट्टी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मूर्ती सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार बनवण्यात आली आहे. कायदा आंधळा नसतो, इंग्रजांच्या वारशातून पुढे जायला हवे, असे त्यांचे मत आहे. आता वेळ आली आहे की, आपण न्यायदेवतेचे स्वरूप बदलले पाहिजे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधू नये, कारण कायदा आंधळा नसतो. यासोबतच हातात तलवार असू नये, कारण ती हिंसेचे प्रतीक आहे. न्यायपालिका राज्यघटनेनुसार न्याय चालवते, त्यामुळे राज्यघटना न्यायदेवतेच्या हातात असली पाहिजे. दुसऱ्या हातात तराजू असणं बरोबर आहे, कारण न्यायव्यवस्था समानतेने न्याय देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT