Rahul Gandhi Tea With Dead Vote saamtv
देश विदेश

National Herald Case : राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप

National Herald Case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर सहा जणांविरुद्ध नवीन एफआयआर दाखल केला आहे. यंग इंडियनच्या माध्यमातून २००० कोटींच्या एजेएल मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी फसवणूक व गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला.

Namdeo Kumbhar

New FIR details in National Herald case against Sonia and Rahul Gandhi : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यासह इतर सहा सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक संस्थांविरुद्ध फसवणूक करून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड विकत घेण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली नवीन गुन्हा दाखल केला.

असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी तत्कालीन काँग्रेसच्या ताब्यातील २००० कोटी रुपयांची मालमत्ता होती. हे अधिग्रहण यंग इंडियनच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचा ७६% हिस्सा होता. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. ईडीने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांसोबत शेअर केला होता. पीएमएलएच्या कलम ६६(२) अंतर्गत ईडी कोणत्याही एजन्सीला अनुसूचित गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.

एफआयआरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी , सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख), इतर तीन जणांसह एजेएल, यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांची नावे आरोपी म्हणून आहेत. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या खासगी तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात केंद्रीय एजन्सीने ९ एप्रिल रोजी राऊस अव्हेन्यू येथील विशेष खासदार/आमदार न्यायालयात गांधी कुटुंब आणि इतर आरोपींविरुद्ध पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

नेमके आरोप काय आहेत?

कोलकाता येथील कथित बनावट कंपनी असलेल्या डोटेक्सने यंग इंडियनला १ कोटी रुपये दिले असल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे यंग इंडियनला काँग्रेसला ५० लाख रुपये देऊन अंदाजे २००० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या एजेएलवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली, असा आरोप करण्यात आला आहे. त्याआधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT