Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, नेमकी चर्चा काय झाली? वाचा राज-उद्धव भेटीची Inside स्टोरी

Why Raj and Uddhav Thackeray met 12 times before elections : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या सलग १२ भेटींमुळे युतीच्या चर्चेला वेग आला आहे. मराठीबहुल प्रभागांच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या चर्चेची इनसाइड माहिती समोर आली आहे.
Thackeray Brothers Reunion Speculation
Thackeray Brotherssaam tv
Published On

Raj and Uddhav Thackeray meet again : मागील पाच महिन्यात ठाकरे बंधूंची १२ वेळा भेट झाली. निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. ५ जुलै २०२५ ते २७ नोव्हेंबर २०२५ या पाच महिन्यात ठाकरे बंधू एक दोन वेळा नव्हे तर १२ वेळा भेटले आहेत. या भेटीमुळे युतीच्या चर्चेला जोर धरलाय. गुरूवारी ठाकरे बंधू पुन्हा एकदा भेटले अन् राजकीय चर्चेने जोर धरला. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. या भेटीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. पाहूयात, ठाकरे बंधूंची नेमकी काय चर्चा झाली?

ठाकरे बंधूंच्या चर्चेत नेमके काय घडले ?

मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी राज ठाकरेंची मनसे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या २० ते २५ जागांचीही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे.

Thackeray Brothers Reunion Speculation
Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही भावांची भेट झाल्याचे बोलले जातेय. मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात पुढील काही दिवसांत महापालिका निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्याआधी मनसे आणि ठाकरे गटांमध्ये युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. महायुतीला रोखण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्यावर उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे म्हटले जातेय.

Thackeray Brothers Reunion Speculation
संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

दादर माहीम, वरळी,शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच आहे. कोण कुठून लढणार याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा दोघांमध्ये होत आहेत, असे सांगण्यात येत आहे. मनसे आणि ठाकरे यांची युती होणार का? महायुतीला टक्कर देण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Thackeray Brothers Reunion Speculation
Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com