Corona Positive Saam tv
देश विदेश

Corona Virus: चीनमध्ये नवा व्हायरस, जगाला पुन्हा धडकी, भारतात लॉकडाऊन लागणार का?

Bat Virus Human Transmission: चीनमधील तज्ज्ञांच्या एका पथकाने नवीन कोरोना विषाणू आढळल्याचा दावा केलाय. या दाव्यामुळे पुन्हा एकदा कोरोना साथीच्या आजाराची परिस्थिती उद्भवणार का? अशी भीती निर्माण झालीय.

Bhagyashree Kamble

२०१९ साली कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला होता. या व्हायरसमुळे शेकडोंच्या घरात मृत्यू झाले होते. अशातच चीनमधील तज्ज्ञांच्या एका पथकाने नवीन कोरोना विषाणू आढळल्याचा दावा केलाय. हा विषाणू माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्ये पसरू शकतो. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा कोरोना साथीच्या आजाराची परिस्थिती उद्भवणार का? अशी भीती सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

बॅटवूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी झेंगली यांच्या नेत्तृत्वाखाली एका पथकानं हा विषाणू शोधला आहे. झेंगली हे ग्वांगझू प्रयोगशाळेचे प्रमुख विषाणूशास्त्रज्ञ आहेत. यासंदर्भात संशोधकांनी सांगितले की, 'आम्ही HKU5-CoV चे वेगळ्या लिनेजचा शोध घेतला आहे. जे केवळ वटवाघूळ ते वटवाघूळ यांच्यात पसरत नसून, मानव आणि इतर प्राण्यांमध्ये देखील संक्रमित होऊ शकतो'. अशी माहिती संशोधकांनी दिली.

संशोधकांना असे आढळून आले की, वटवाघळांपासून माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे. हा व्हायरस त्याच मानवी रिसेप्टरचा वापर करतो. हा व्हायरस थेट कोणत्याही माध्यमातून पसरू शकतो. यात ४ वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे. या पैकी दोन वटवाघळांमध्ये आढळतात. या विषाणूवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे.

शी झेंगली यांच्या टीमनं पुढे सांगितलं की, HKU5-CoVचा धोका अद्याप नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विषाणूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. टीमनं पुढे स्पष्ट केलं की, हा विषाणू कोविडपेक्षा अधिक घातक नाही. त्यामुळे मानवाला जास्त धोका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT