नवी दिल्ली : अंतराळ संशोधनाच्या (Space research) बाबतीत जुलै 2021 महिना महत्त्वाचा ठरला आहे. या महिन्यात, 2 अब्जाधीशांनी त्यांच्या कंपन्यांद्वारे अंतराळ प्रवासाचे व्यापारीकरण करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न केले. त्याचबरोबर एका हौशी खगोलशास्त्रज्ञाने (Astronomer) खूप महत्वाचा शोध लावून या महिन्याला अधिक खास केले आहे. (Amateur astronomer discovers Jupiter's moon)
बृहस्पतिचा नवीन चंद्राचा शोध
काई ली (Kaai lee) नावाच्या या हौशी खगोलशास्त्रज्ञाने बृहस्पतिच्या (Jupiter) दुसऱ्या चंद्राचा शोध लावला आहे. यापूर्वीच बृहस्पतिच्या 80 चंद्रांचा शोध लावण्यात आला आहे. बृहस्पतिच्या या सर्व चंद्राचा शोध नासा, ईएसए किंवा विद्यापीठांसारख्या अवकाश एजन्सीच्या संशोधकांनी लावला आहेत. मात्र हौशी खगोलशास्त्रज्ञांनी असा महत्त्वपूर्ण शोध लावल्याची घटना पहिल्यादांच घडली आहे प्रथमच घडवला आहे. एखाद्या हौशी खगोलशास्त्रज्ञाला एखाद्या ग्रहाचा चंद्र सापडला, असे सांगण्यात मला प्रचंड अभिमान वाटत असल्याच्या भावना काय ली यांनी व्यक्त केली आहे."
उन्हाळ्याच्या सुट्टीत खगोलशास्त्राचे घेतले शिक्षण
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये के लीने छंद म्हणून खगोलशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर या क्षेत्रात तिची आवड वाढली. अंतराळ संशोधनाची आवडीतून काई ली यांना बृहस्पतिच्या चंद्राचा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनाचे अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. परंतु अद्याप शैक्षणिक नियतकालिकांत ते प्रकाशित झालेले नाहीत. या चंद्राला आता EJc0061 नाव देण्यात आले आहे. 2003 मध्ये नासाने याचा एक फोटो मिळवला होता, मात्र नंतर तो अंतराळातील खडकांचा समूह समजण्यात आला होता. गेल्या वर्षीही काई ली यांनी अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गेल्या वर्षी त्यांनी बृहस्पतिचे 4 हरवलेले चंद्र शोधून काढले होते.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.