nepal accident news  Saam TV Marathi
देश विदेश

जत्रेला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहन ७०० मीटर खोल दरीत कोसळलं, २० जणांचा मृत्यू

nepal jeep accident update : जत्रेला जाणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नेपाळमध्ये घडला भीषण अपघात

प्रवाशांनी भरलेली जीप दरीत कोसळली

भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू

नेपाळमधून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत्रेला जाणाऱ्या २० प्रवाशांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नेपाळमधील थवांग नगरपालिकेच्या जलचाला हद्दीत ही दुर्घटना घडली. पावसामुळे रस्त्यावरील चिखलामुळे प्रवाशांनी भरलेली जीप घसरून थेट खोली दरी कोसळली. ७०० फूट दरीत जीप कोसळल्याने एकूण २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या रोल्पा जिल्ह्यात जत्रेला जाणाऱ्या जीपचा अपघात झाला. डोंगराळ भागातून जाताना जीप रस्त्यावरून थेट ७०० मीटर खोल दरीत कोसळली. यात २० जणांनी प्राण गमावले. थवांग नगरपालिकेच्या जलजाला हद्दीत अपघाताचा थरार घडला. डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाल्याने चिखलामुळे जीप घसरून खाली कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

२० जणांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात झाल्याची मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आताही पोलीस आणि बचाव पथकाकडून कार्य सुरू आहे. २० जणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तत्पूर्वी, नेपाळमध्ये जलजालासारखाच भीषण अपघात आणखी एका ठिकाणी झाला होता. दुसऱ्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. नेपाळच्या मध्य भागात १० फेब्रुवारी अपघाताची घटना घडली होती. अपघातावेळी बसमधील १२ प्रवासी होते. तर ८ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. ही बस काठमांडूहून ओखलढुंगा या भागात चालली होती. याचदरम्यान बागमती प्रांतातील रामेछाप नगरपालिका बसचाही अपघात झाला होता. पालिकेची बस तामाकोशी नदीत कोसळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT