nepal news Saam tv
देश विदेश

माजी पंतप्रधानांना अटक होणार? घरात आढळल्या बनावट नोटा, राजकीय वर्तुळात खळबळ

nepal former prime minister : माजी पंतप्रधानांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नेपाळचे माजी पंतप्रधान देऊबा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत

माजी पंतप्रधान देऊबा यांनी आरोप फेटाळले

नेपाळमधील बालेन शाह यांच्या नेतृत्वातील नवी सराकर अॅक्शन मोडमध्ये आहे. नेपाळ सरकारने माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे.

७९ वर्षीय शेर बहादूर देऊबा यांच्यावर नेपाळबाहेर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे आहेत. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेस, असं देऊबा यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत देऊबा यांनी म्हटलं की, 'माझ्या कुटुंबाच्या संपत्तीविषयी चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे'.

शेर बहादूर देऊबा यांच्या घरात झेन-जी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा तपास देखील करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाची तपासणी देखील केली होती.

नेपाळ सरकारने देऊबा यांच्या व्यतिरिक्त त्यांची पत्नी, माजी परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांच्या विरोधात देखील अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. देऊबा यांच्या म्हणण्यांनुसार, ते आणि त्यांची पत्नी वैद्यकीय उपचारासाठी देशाबाहेर आहेत. उपचारासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे त्यांनी नेपाळमध्ये कधी येणार, याविषयी कोणती माहिती दिलेली नाही. नेपाळ सरकारने अटक वॉरंट जारी केल्याने त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु अटक होण्याची आधी त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो का, याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT