Nepal Plane Crash Saam TV
देश विदेश

Nepal Plane Crash: नेपाळच्या काठमांडूमध्ये विमान कोसळलं; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, धडकी भरवणारा VIDEO

Video Of Plane Crash in Nepal Kathmandu: नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला.

Satish Daud

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला. उंचावरून हे विमान थेट खाली कोसळलं. या दुर्घटनेत घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्ती केली जात आहे. सध्या मदतकार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची (Nepal Plane Crash)राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान हे विमान कोसळलंय. अपघातग्रस्त विमान काठमांडू येथून पोखराला जात होते. या विमानातून एकूण १९ प्रवासी प्रवास करीत होते. काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सूर्या एअरलाइन्सचे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झाले.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास विमानाने काठमांडू धावपट्टीवरून उड्डाण भरले. मात्र, काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली. बघता-बघता विमान धावपट्टीवरच कोसळले. या दुर्घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

विमानाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. विमानातील सर्वच १९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळमध्ये सातत्याने विमान अपघाताच्या घटना घडतात. दरवर्षी येथे सरासरी एक विमान अपघात होतो.

२०१० पासून नेपाळमध्ये आतापर्यंत किमान १२ विमान अपघात झाले आहेत.जानेवारी २०२३ मध्ये नेपाळमध्ये असाच एक अपघात झाला होता. पोखराजवळ यति एअरलाइन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये पायलटसह ७२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT