नेपाळ, तिबेटमधील प्रलयात हजारो कुटुंबांचं आयुष्य उदध्वस्त झालं आहे.. अनेक घरं, वाहनं, शेती वाहून गेलीय. हजारो लोक बेपत्ता आहेत. काहीतरी चमत्कार घडेल, देवाच्या कृपेने आपले प्रियजन भेटतील या अपेक्षेने अनेकजण नदी किनारी भटकत आहेत. तीच अवस्था पाळीव प्राण्यांचीही झाली आहे.. घर जमीनदोस्त झालं असलं तरी अनेक कुत्रे ढिगाऱ्याजवळ घुटमळत आहेत. जिथे काही दिवसांपूर्वी आपला मालक राहात होता. ती जागा हे प्राणी सोडायला तयार नाहीत.
ढुंगे भागात एका हॉटेलच्या परिसरात वावरणारी ही लिली. जिथे एकेकाळी तिचे घर होते. ती जागा आता फक्त विध्वंसाची एक खूण बनून राहिलीय. पण लिली ती जागा सोडायला तयार नाही. तिचा पट्टा अजूनही तिच्या गळ्यात आहे. स्थानिक लोक तिची काळजी घेत असले तरी लिलीची नजर मात्र तिला खाऊ घालणाऱ्या हॉटेल मालकाचा शोध घेत असते. लिली दिवसभर भटकून पुन्हा त्याच ठिकाणी परत येते. आणखी एका व्हिडिओत एक कुत्रा नुकसान झालेल्या घरात बसलेला दिसतोय. सर्वत्र चिखल, ढिगारे आणि तुटलेल्या भिंती असतानाही हा कुत्रा पडक्या घरात शांतपणे बसून राहिलाय.
पुराच्या पाण्याने केवळ चिखल आणि ढिगाराच आणला नाही, तर पाळीव प्राण्यांनाही त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले. आपल्याला खाऊपिऊ घालणारं, आपल्याला मायेची उब देणारं कुटुंब परत कधीच येणार नाही. याची जाणीव कदाचित या मुक्या प्राण्यांनाही झालेली असली तरी आपल्या मालकांची वाट बघणं मात्र त्यांनी काही सोडलेलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.