Nepal Flood Saam Tv
देश विदेश

Flood: भारताशेजारी पुराचे थैमान, २८ पोलिसांसह १००० जण वाहून गेले; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

Nepal Flood Video: नेपाळमध्ये पूराने हाहाकार केला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची अनेक गावं वाहून गेली. या पुरामध्ये १००० जण बेपत्ता झाली असून यामध्ये २८ पोलिसांचा समावेश आहे.

Priya More
  • नेपाळमध्ये भीषण पूरस्थिती

  • तिबेट सीमेवरील नेपाळमध्ये पूराचा हाहाकार

  • नेपाळमध्ये २८ पोलिसांसह १००० जण पुरात वाहून गेले

  • अनेक गावं पूराच्या पाण्यात वाहून गेली

नेपाळमध्ये पूराने हाहाकार केला आहे. हिमनद्या आणि पुरामुळे नेपाळमधील चिंता वाढली आहे. बुधवारी तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या नेपाच्या रसुवा जिल्ह्यात पूरामुळे अनेक गावं वाहून केली. अनेक मुलभूत सुविधांच्या प्रकल्पाचे देखील मोठे नुकसान झाले. नेपाळच्या स्याफ्रुबेसी आणि तिमुरे भागांना याचा सर्वाधिक फटका बसला. या पूरामध्ये २८ पोलिसांसह १००० नागरिक वाहून केले. या पुरामुळे कशापद्धतीने नेपाळचं नुकसान झाले याचे थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेपाळमध्ये पूरस्थिती भीषण होत चालली आहे. भोटे कोशी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीकाठच्या अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पूरामुळे नदी काठच्या गावाचे आणि प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या पूरामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी पूरग्रस्त भागांमध्ये पोलिस आणि लष्करासह मदत आणि बचाव पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. भोटे कोशी नदीच्या काठावर असलेल्या गावातील घरं अक्षरश: पत्त्यांसारखी खाली कोसळून पूरामध्ये वाहून गेली. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. सरकारने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आणि परिस्थिती गंभी असल्यास तात्काळ उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

या पूराचा परिणाम फक्त नेपाळच्या सीमांपुरता मर्यादित नाही. भोटे कोशी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. पुढे नेपाळमध्ये ती त्रिशुली नदीला मिळते आणि त्रिशुलीचे पाणी गंडक नदी म्हणून भारतात वाहत येते. यामुळेच नेपाळमधील अशा अचानक येणाऱ्या पुराचा परिणाम भारतावर होणार आहे. नेपाळमधून येणारी नदी भारताच्या बिहारमधून वाहते. जर पाण्याचा प्रवाह खालच्या दिशेने असाच सुरू राहिला, तर त्याचा परिणाम बिहारमधील गंडक नदीवर होऊ शकतो. सध्याच्या पुराचे किती पाणी भारतात पोहोचेल आणि त्याचा परिणाम किती गंभीर असेल हे आताच सांगता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

SCROLL FOR NEXT