NeoCov  SaamTvNews
देश विदेश

NeoCov या नव्या व्हेरियंटमुळे होईल मृत्यूतांडव!चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांचा धोक्याचा इशारा

चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांचे संशोधन; तीन रुग्णांपैकी एकाचा होईल मृत्यू, कोरोनाच्या NeoCov या व्हेरियंटचा प्रसार जलदगतीने होतोय आणि मृत्यूदर देखील जास्त असणार...

वृत्तसंस्था

दिल्ली : चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोविड-19 हा विषाणू पहिल्यांदा सापडला. त्यांनतर ज्या पद्धतीने सगळ्या जगाला या चिनी विषाणूने हैराण केले आहे ते आपण सर्वजण पाहत आहोतच. कोरोना विषाणू विरुद्धची लढाई संपूर्ण जग मानवी संकट मानून लढत आहे. मात्र, हा व्हायरस सातत्त्याने उत्परिवर्तित होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना, डेल्टा , डेल्टाप्लस आणि आता ओमिक्रोन असा ह्या व्हायरसचा स्वतःत बदल करण्याचा प्रवास आपण अनुभवत असतानाच आता पुन्हा सगळ्यांनाच चिंतेत टाकणारी माहिती समोर येत आहे.

हे देखील पहा :

रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार, चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटबद्दल संशोधन केले असून दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या NeoCov या नव्या व्हेरियंटचा उदय झाल्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. या व्हेरियंटचा फैलाव अत्यंत वेगाने होत असून यामध्ये मृत्यू आणि संक्रमण दर उच्च असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

या अहवालानुसार, निओकोव्ह (NeoCov) विषाणू तसा नवीन नाही. हा विषाणू MERS-CoV विषाणूशी संबंधित असून, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये 2012 ते 2015 मध्ये SARS-CoV-2 या विषाणूच्या उद्रेकात तो सापडला असून SARS-CoV-2 सारखाच आहे, ज्यामुळे मानवामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला.

NeoCoV दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळला होता आणि फक्त या प्राण्यामध्येच त्याचा प्रसार होतो. bioRxiv या वेबसाइटवर प्रीप्रिंट म्हणून प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, NeoCoV आणि त्याच्याशी संलग्न असलेला PDF-2180-CoV हे दोन्ही विषाणू मानवाला अत्यंत धोकादायकरीत्या संक्रमित करू शकतात.

वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सच्या संशोधकांच्या मते, निओकोव्ह या व्हायरसला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन आवश्यक आहे. संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये असे म्हटले आहे की या नवा व्हायरस अत्यंत धोकादायक आहे; कारण तो ACE2 रिसेप्टरला कोरोनाव्हायरस रोगजनकापेक्षा वेगळ्या पद्धतीने निर्माण करतो. परिणामी, श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या किंवा लसीकरण झालेल्या लोकांमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज किंवा प्रथिनांचे रेणू देखील NeoCoV विरुद्ध संरक्षण करण्यात असमर्थ ठरतात!

चिनी संशोधकांच्या मते, निओकोव्हचा मृत्यू दर अत्यंत जास्त असून, प्रत्येक तीन संक्रमित व्यक्तींपैकी एकाचा यामुळे मृत्यू होतो. NeoCoV संदर्भातील माहिती स्पष्ट केल्यांनतर, रशियन स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी गुरुवारी एक निवेदन जारी केले आणि त्यात म्हटले आहे कि, आमच्या वेक्टर संशोधन केंद्राला चिनी संशोधकांनी NeoCoV या कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरियंट बाबत मिळवलेल्या डेटाची माहिती आहे. याक्षणी, हा मुद्दा मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम असलेल्या नवीन कोरोनाव्हायरस बद्दलचा नसून आगामी काळात संभाव्य जोखमींचा अभ्यास करणे आणि पुढील तपासणी करणे आवश्यक आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT