Pune : "मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण!

Pune : भाई नाही म्हटलं म्हणून तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण !
Pune : "मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण!
Pune : "मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण!SaamTvNews

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरामध्ये का अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. "मला भाई का म्हणाला नाही" म्हणून गाव गुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन, कमरेच्या बेल्टने व लाठ्या-काठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकून कुत्र्याप्रमाणे (Dog) ती बिस्किटे खाण्यास भाग पाडले. ही घटना थेरगावातील (Thergaon) गणेशनगर येथे 25 जानेवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून या गावगुंडांनी या घटनेचा व्हिडीओ (Video) मोबाईल कॅमेरावर शूट करून सोशल मीडियावर वायरल देखील केला आहे.

प्रथमेश राजेंद्र दबडे (वय २०, रा.थेरगाव) या तरुणाला या गाव गुंडांच्या टोळक्याने कुत्र्यासारखी बिस्कीट खायला लावून बेदम मारहाण केली आहे. प्रथमेशने या संदर्भात वाकड (Wakad) पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगारासह (Criminal) प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव ), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वाकड पोलिसांनी या गाव गुंडाच्या टोळक्यातील पाच आरोपींना अटक (Arrest) केली आहे. आरोपी व फिर्यादी हे दोघे ऐकमेंकांच्या ओळखीचे आहेत.

Pune : "मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण!
Pune : उरुळी कांचन मध्ये 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार!

सराईत गुन्हेगार असलेला आरोपी रोहन वाघमारे याने फिर्यादीस फोनवर शिवीगाळ करून भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार फिर्यादी मंगळवारी (ता. २५) रात्री साडे दहाच्या सुमारास गणेशनगर येथे आला. यावेळी आरोपी रोहनने फिर्यादी प्रथमेश यास तू मला फोनवर शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली. सर्व विचारपूस होत असतांनाआरोपीला राग आला व 'तू मला रोहन का म्हणालास , मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे' असे म्हणत त्याने प्रथमेश यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Pune : "मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण!
बनायचं होत डॉक्टर, बनला खुनी; एका चापटचा बदला मित्राचा खून करून घेतला!

या शिवीगाळीचे पर्यवसन मारहाणीत (Beating) झाली आणि आरोपी रोहनसह त्याच्या इतर साथीदारांनी कमरेच्या बेल्टने प्रथमेश यास मारहाण करण्यास सुरुवात केली आणि जमीनीवर टाकलेली बिस्किटे कुत्र्याप्रमाणे खाण्यास भाग पाडले. दरम्यान, इतर आरोपींनीही फिर्यादीला शिवीगाळ करीत बेल्टने व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये प्रथमेश जखमी झाला आहे. आरोपींनी प्रथमेश याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com