Neet Result Controversy Saam Tv
देश विदेश

Neet Result Controversy: नीट परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे आदेश

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही मुंबई

नीट परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार असल्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नीट संदर्भात पुढील सुनावणी ८ जुलैला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने एनटीएला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे एनटीएला उत्तर द्यावे लागणार आहे.

सध्या होणारी अॅडमिशन रद्द करावीत, अशी याचिकाकर्त्यांच मागणी होती. मात्र कोर्टाने या याचिकेस नकार दिला आहे. पुढील महिन्यात ८ तारखेला होणाऱ्या सुनावणीत काही महत्त्वाचे निर्देश न्यायालय देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावून नीट पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर उत्तर मागितलं (Neet Result Controversy) आहे.

नीट परीक्षेसंदर्भात नेमका वाद काय?

नीट २०२४ चा निकाल आल्यानंतर एक मोठा वाद सुरू झाला आहे. निकालामधील अनियमितता आणि ग्रेस मार्क्स देण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विविध विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या त्रुटींबाबत तक्रारी केल्या आहेत. परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी होत आहे. ही परीक्षा घेणारी एजन्सी एनटीए विरोधात विद्यार्थ्यांचा संताप सातत्याने वाढत आहे. जेएनयू विद्यार्थी संघटना AISA ने सोमवारी दिल्लीत निदर्शने केली होती. संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमधूनच या निकालाविरोधात रोष व्यक्त होत असल्याचं दिसत (Neet Result) आहे.

नीटचा निकाल (NEET 2024) ४ जून रोजी जाहीर झाला होता. या निकालात घोळ असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. लखनऊच्या आयुषी पटेलने आरोप केलाय की, तिला एनटीएकडून मिळालेली ओएमआर शीट फाडण्यात आली आहे. तिच्यासोबत मोठा घोटाळा झाल्याचं ती म्हणत आहे. ज्या दिवशी निकाल जाहीर झाला, त्या दिवशी तिचा निकाल दिसत नव्हता. त्यानंतर तासाभराने एनटीएकडून एक मेल आला. तिची ओएमआर शीट फाटलेली आणि खराब झालेली आढळल्याने निकाल येऊ शकत नाही, असा त्यात उल्लेख असल्याचं आयुषीने सांगितलं आहे.

नीट निकालाच्या वादाचे कारण काय?

ओएमआर शीट फाडल्याचा आरोप होत (Neet Exam) आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाइन दाखवले जात नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी आहेत, म्हणजेच त्यांना ओएमआर शीटनुसार जे गुण मिळायला हवे होते, ते मिळालेले नाहीत. यावेळी नीटच्या निकालात एकूण ६७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. एकाच केंद्रातून ६ टॉपर्स आले आहेत. काही विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ गुण देखील मिळाले आहेत, ते अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT