kerala neet exam Saam TV
देश विदेश

NEET परीक्षेसाठी विद्यार्थीनींना काढायला लावले अंतर्वस्त्र; केरळमधील धक्कादायक प्रकार

याप्रकरणी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

कोल्लम : राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा 'नीट' देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीला अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनींनी हा आरोप केला आहे. हा धक्कादायक प्रकार केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर घडला. परीक्षार्थी विद्यार्थीनींनी आरोप केला आहे की, जेव्हा त्या पेपर देण्यासाठी सेंटरवर पोहचल्या. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अंतर्वस्त्र काढायला लावली. (kerala neet exam student remove bra)

याप्रकरणी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं परीक्षा केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहितीनुसार, कोल्लम जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर तक्रारदार विद्यार्थीनी पेपर देण्यासाठी गेली होती. त्यावेळी सुरक्षा तपासणीदरम्यान, तिच्या कपड्यावरील धातूचे हुक वाजले.

विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये ‘मेटलिक हुक’ असल्याने तिला सुरक्षा रक्षकांनी तिला अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले. या मुलीनंतर परीक्षा देण्यासाठी आलेल्या इतर विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्रही तपासण्यात आले. या घटनेचे वृत्त वेगाने पसरले. यामुळे हे परीक्षा केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सदरील मुलगी अपमानित झाली. महिला सुरक्षा रक्षकाने तपासणी केल्यानंतर तिची अंतर्वस्त्र तिच्या आईकडे दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने अंगावर अंतर्वस्त्र नसल्याने शरीर झाकण्यासाठी शाल मागितली.

या घटनेनंतर महिला सुरक्षा कर्मचार्‍यांच्या वृत्तीची जोरदार चर्चा रंगली होती. दुसरीकडे, ज्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला त्यांनी मात्र, या प्रकाराचे खंडन केले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Edited By Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT