Neeraj Chopra Saam Tv
देश विदेश

नीरज चोप्राने रचला इतिहास! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर कोरले नाव

नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भाला फेकला.

Santosh Kanmuse

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भाला फेकला या भाल्याने त्याला रौप्य पदक मिळवून दिले आहे. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनाडा अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर भालाफेक करून जिंकला आहे. (Neeraj Chopra Latest News)

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजने जागतिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने पटकावले.

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.४६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले तर झेक प्रजासत्ताकच्या याकुब वालदेशने कांस्यपदक मिळवले. भारताचा रोहित यादवने ७८. ७२ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह १० वे स्थान मिळविले.

नीरजने (Neeraj Chopra) या स्पर्धेत पदक जिंकून एक विक्रम केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. त्याच्या आधी अनुभवी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये या स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते.

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फॉल होता. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८२.३९ मीटर, तर तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८६.३७ मीटर भालाफेक केली. याशिवाय चौथ्या प्रयत्नात नीरजने ८८.१३ मीटर भालाफेक करत आपली बाजू मजबूत केली आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. मात्र पाचव्या फेरीत तो अपयशी ठरला. त्याचा भालाफेक फॉल घोषित करण्यात आला. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.१३ मीटर होती. दुसरे स्थान कायम राखत रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT