३०-४० धावा करूनही अनेक वर्षे संघात क्रिकेटर राहिलेत; विराट कोहलीला अंजुम चोप्राचा पाठिंबा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची गेल्या काही दिवसांपासून खराब फलंदाजी सुरु आहे.
Virat Kohli
Virat KohliSaam Tv

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून खराब फलंदाजी सुरु आहे. जवळपास ३ वर्षांपासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. त्याच्या फॉर्मबाबत अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली आहेत तर काहींनी त्याला विश्रांतीचा सल्लाही दिला आहे. आता माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोप्राने विराटचे समर्थन केले आहे. 'विरोटने सराव केला पाहिजे आणि तो जबरदस्त पुनरागमन करेल. असं मत अंजुम चोप्राने व्यक्त केले आहे.(Virat Kohli Latest News)

Virat Kohli
....तर भारत यशाचं 'शिखर' गाठणार, पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडण्याची भारताला संधी

'मी अशा अनेक खेळाडूंना ओळखते ज्यांनी ३०-४० धावा करूनही संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. त्या पटीत विराटच्या ३०-४० धावा कमी वाटत आहेत. कारण त्याने आतापर्यंत मोठी धावसंख्या केली आहे. मला खात्री आहे विराट (Virat Kohli) पुन्हा भरपूर धावा करून पुनरागमन करेल, असंही अंजुम चोप्रा म्हणाल्या.

२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धही कायम राहिला. यानंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली नाही. माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी अलीकडेच विराट कोहलीला संघातून वगळण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी विरोधात होते.(Virat Kohli Latest News)

'विराट कोहलीला (Virat Kohli) स्वतःला माहित आहे की त्याला काय हवे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या नावानुसार स्कोअर करू शकत नाही. तेव्हा तुम्ही जास्त सराव करता. आशा आहे की विराट सराव करेल. तो फॉर्ममध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. सध्या ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे, त्यात तुम्ही सरावाच्या जोरावरच पुनरागमन करू शकता, असंही अंजुम चोप्रा म्हणाल्या.(Virat Kohli Latest News)

अंजुम चोप्रा पुढे म्हणाल्या, 'खेळाडू फक्त प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यासारखा खेळाडू यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावा. काहीवेळा गोष्टी तुम्ही जशा विचार करता त्याप्रमाणे घडत नाहीत. गेली अनेक वर्षे त्याच्यावर इतके लक्ष केंद्रित केल्यामुळे नेहमीच थोडासा कल असतो.(Virat Kohli Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com