vishal yadav  Saam tv
देश विदेश

Vishal Yadav Pakistan Case : घरातच गद्दार, ५० हजारांसाठी विकला; नौदलाच्या कर्मचाऱ्याने पाकिस्तानला दिली भारताची अतिमहत्वाची माहिती

Vishal Yadav Pakistan Case update : नौदलाच्या कर्मचाऱ्याने पैशांसाठी भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचे उघड झालं.या प्रकरणी पोलिसांनी विशाल यादवला अटक केली आहे.

Vishal Gangurde

भारत आणि पाकिस्तानाच्या तणावादरम्यान सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर काम करत आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे वेगवेगळ्या विभागात कारवाईचा धडाका लावला आहे. राजस्थान पोलिसांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोपाखाली नौदलातील एका कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नौदलातील अपर डिव्हिजन क्लर्क विशाल यादवने गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली. त्याने चौकशीत नवनवीन खुलासे केले आहेत. त्याने ऑपरेशन सिंदूरबाबत अतिमहत्वाची माहिती पाकिस्तानी हँडलरला दिली. त्या बदल्यात विशाल यादवला ५० हजार रुपये मिळाले. आतापर्यंत विशालच्या खात्यात २ लाख रुपये मिळाले आहेत. विशालला अटक केल्यानंतर त्याला जयपूर कोर्टात हजर केलं होतं. कोर्टाने विशालला ४ दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून विशालची पाकिस्तानी हँडलरसोबत मैत्री झाली होती. प्रिर्या शर्मा असं हँडलरचं नाव होतं. त्याने चॅटिंग करताना गोपनीय माहिती दिली. दोघांनी एकमेकांना व्हॉट्सअॅपचे नंबर दिले होते. दोघांनी टेलीग्रामचा वापर करत होते.

पाकिस्तान हँडलर प्रिया शर्मा नावाने महिनाभरापासून विशालशी बोलत होती. विशाल भारताची गोपनीय माहिती देत होता. त्याचे पैसे विशालला मिळत होते. विशाल हा प्रियाच्या जाळ्यात अडकला होता. विशालने ऑपरेशन सिंदूरदरम्यानही नौदल आणि इतर माहिती प्रियाला दिली. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावर प्रियाने त्याला सांगितलं की, 'तुम्ही सी ग्रेडची माहिती दिली आहे. तुम्ही चांगली माहिती द्या. तुम्हाला अधिकचे पैसे देऊ'. विशालने ऑपरेशन सिंदूरदरम्यान नौदल आणि सुरक्षासंबंधी प्रियाला माहिती दिली. या माहितीसाठी एकदा ५० हजार रुपये मिळाले होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT