PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

NDA Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज; आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत PM मोदी मार्गदर्शन करणार

NDA Meeting: आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक होणार आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विरोधकानंतर आता सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीतील उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. (Latest Marathi News)

2024 च्या लोकसभा निवडणुका सलग तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांना बैठकीचं निमंत्रण धाडलं आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गदर्शन करणार आहेत.

विरोधकांची एकी होत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची तिसऱ्यांदा सत्ता कशी आणता येईल, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपकडून संध्याकाळी ५ वाजता हॉटेल अशोका या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला 38 मित्रपक्ष उपस्थित राहातील, असा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटालाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहाणर आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीच निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. मात्र, भाजपचे राज्यात मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, दिवंगत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष यांना मात्र बैठकीच निमंत्रण नाही.

देशभरातील अनेक पक्ष जे मागच्या काही दिवसांपासून भाजपपासून दूर गेले होते, त्यांना पुन्हा जवळ घेत आजच्या बैठकीला भाजपकडून निमंत्रण देण्यात आलं आहे .

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हे पक्ष राहणार उपस्थित, जाणून घ्या

भाजप - नरेंद्र मोदी, जे पी नड्डा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) - अजित पवार

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) - चिराग पासवान

शिवसेना (शिंदे गट) - एकनाथ शिंदे

आरपीआय (आठवले गट) - रामदास आठवले

प्रहार जनशक्ती पक्ष - बच्चू कडू

जनसुराज्य पक्ष - विनय कोरे

सुहेलदेव भारतीय समाज पक्ष - ओपी राजभर

राष्ट्रीय लोक जनशक्ती - पशुपती पारस

लोक जनशक्ती पार्टी - चिराग पासवान

राष्ट्रीय लोक जनता दल - उपेंद्र कुशवाह

अण्णा द्रमुक - पलानिस्वामी

मगोप - सुदिन ढवळीकर

निषाद पार्टी - संजय निाषाद

हिंदूस्थानी अवाम मोर्चा - जितनराम मांझी

विकासशील इन्सान पार्टी - मुकेश सहनी

इंडिया मक्कळ काळवी मुनेत्र कळघम -

नॅशनल पीपल्स पार्टी -

राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी -

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा -

जननायक जनता पार्टी -

ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन -

मिझो नॅशनल फ्रंट -

तमिळ मनिला काँग्रेस -

आयपीएफटी (त्रिपुरा) -

बोडो पीपल्स पार्टी -

पताली मक्कळ काची -

अपना दल (सोनेलाल) -

एजीपी-

युनायटेड पीपल्स पार्टी- लिबरल

ऑल इंडिया एनआर काँग्रेस -

शिरोमणी अकाली दल संयुक्त (ढिंढसा) आणि जनसेना (पवन कल्याण) -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT