Nitin Gadkari Threat Calls: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मास्टरमाईंड अफसर पाशा याने पोलिस चौकशीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील (RSS) रागामुळे नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं आहे.
अफसर पाशा हा सध्या नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) ताब्यात आहे. दहशतवादी नेटवर्क वाढवण्यासाठी तो २००३-०४ मध्ये मध्य नागपुरात वास्तव्याला होता. त्याने यादरम्यान काही लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या.
बेळगावच्या तुरुंगातून तो लष्कर-ए-तोयबाचा स्लिपर सेल चालवत होता. दरम्यान, सध्या गडकरी धमकी प्रकरणात पोलिस त्याची चौकशी करत असून काही पाशाने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील (RSS) रागामुळे नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं आहे.
आतंकवादी अफसर पाशा बांगलादेश आणि सउदी अरबियात जाऊन आतंकवाद्यांच्या संपर्कात आला. अफसर पाशा याने बांगलादेश आणि सऊदी अरबियात घेतली. त्याचबरोबर त्याने आतंकवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
बांगलादेश आणि सऊदी अरबियातून आल्यानंतर त्याने बंगलुरु येथे आतंकवादी हल्ला केला होता.कर्नाटकातील वेगवेगळ्या जेलमध्ये शिक्षा भोगत असताना अफसर पाशाने आतंकवादी नेटवर्क वाढवलं.
आतंकवादी नेटवर्कमधील जयेश पुजारीकडून अफसर पाशा याने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकीचा फोन करायला सांगितला, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. अफसर पाशा लष्कर ये तोयबा आणि ‘पीएफआय’चा आतंकवादी असून त्याच्यावर UAPA कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.