supriya sule  saam tv
देश विदेश

Women Reservation Bill: 'श्रेयवाद नंतर होईल, पण...'; महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करत सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Supriya Sule On Women Reservation Bill: या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Supriya Sule News:

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर संसदेत गदारोळ झालेला पाहायला मिळाला. काही पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. तर काहींनी स्वागत केलं आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'महिला आरक्षण विधेयकाबद्दल भावना मिश्र आहेत. पण राष्ट्रवादी म्हणून मी या विधेयकाचं स्वागत करते. मी विधेयकाविषयी सविस्तर वाचल्यानंतर बोलेल. 2029 साली हे विधेयक लागू होईल'.

'या विधेयकासाठी भाजपने सगळ्या पक्षांशी बोलणं केलं आहे का, हे माहीत नाही. राज्यसभेसाठी हे काय करणार आहेत हे स्पष्ट झालं नाही, असं त्या पुढे म्हणाल्या. तर श्रेयवादाच्या प्रश्नावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, 'श्रेयवाद नंतर होईल. पण आधी बिल तर पास होऊ द्या'.

सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं कौतुक केलं. तसेच भाजप नेत्यांना चिमटाही काढला. सुळे म्हणाल्या, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं कौतुक करते. त्यांचं प्रशासनात सातत्य आहे'.

तसेच यावेळी सुळे यांनी भाजपच्या दोन दिवंगत नेत्यांचीही आठवण काढली. ते मोठे होते. तसेच असाधारण खासदार होते. त्यांचा आम्ही आदर करतो. हे नेते म्हणजे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

SCROLL FOR NEXT