Bharat Ratna Saam Digital
देश विदेश

Bharat Ratna: भारतरत्नसाठी दोन्ही नावं योग्य, पण...,लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Lal Krishna Advani Bharat Ratna News: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिराच्या उभारणीत सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sandeep Gawade

Bharat Ratna News Update

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिराच्या उभारणीत सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर अनेक नेत्यांनी अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या असून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

केंद्र सरकारने यंदा भारतरत्न पुरस्कारासाठी करपुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची घोषणा केली आहे. करपुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी दोघेही या पुरस्काराचे मानकरी होते आणि सरकारने त्यांना भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करून सन्मान केला आहे. अडवाणी संसदेत अनेक वर्षी होते. त्यांचा पराभव कधी झाला नाही. त्यांनी राम मंदिरासाठी देशात रथयात्रा काढली त्यावेळी मतभेद झाले होते. पण बाकीच्या कोणत्याच बाबतीत विरोध नव्हता. एक राजकारणी आणि व्यक्ती म्हणून त्यांच्याशी कसलेही मदभेद नव्हते. भाजप नेते, संसदेचे सभासद आणि मंत्री म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली आहे. त्यांना भारतरत्न देण्यात थोडा उशीर झाला पण या पुरस्कारासाठी योग्य निवड झाल्या पवारांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिला, त्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT