NCERT Decision Saam Tv
देश विदेश

NCERT च्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल हद्दपार; सरकारचा मोठा निर्णय

NCERT Decision: एनसीईआरटीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली राजवटीचा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एनसीईआरटीचा अभ्यासक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. त्यावरून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलाय. नेमकं मुघलांचा इतिहास हटवून विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाणार, हे पाहूयात. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमात हा बदल करण्यात आला आहे. याआधीही अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकांच्या पहिला भागात हा बदल करण्यात आला आहे.

इतिहासातून मुघल हद्दपार..महाकुंभचा धडा शिकवणार

इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आलेत. त्याऐवजी भारतीय राजघराणी महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या सरकारी उपक्रमांची माहिती अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकायला लागणार आहे.

मुघल आणि दिल्ली सल्तनतचा उल्लेख हटवला

एकीकडे राज्य सरकारमधील मंत्री एनसीईआरटीच्या या अभ्यासक्रमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे विरोधकांकडून या नव्या प्रकरणाचा तीव्र विरोध केला जातोय.

मुघलांच्या वंशजांनी सरकारला मुघलांचा इतका द्वेष का? असा सवाल केलाय.

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचे आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटवण्यामागे नेमका काय उद्देश्य आहे..? . अभ्यासक्रमातून मुघल हटवल्यानंतर देशाचा हा इतिहास विद्यार्थ्यांना कसा कळणार...? कुंभमेळ्याचा धडा समाविष्ट करताना मुघलांची कारकिर्दीला अभ्यासक्रमात कात्री का... सरकारी उपक्रमांची माहिती विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात कशासाठी? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

Viral Video: किळसवाणा प्रकार! रेल्वेमध्ये वापरतायत खरकटे प्लेट्स अन् डबे; VIDEO व्हायरल

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

SCROLL FOR NEXT