NCERT Saam Digital
देश विदेश

NCERT: मोठी बातमी, पाठ्यपुस्तकांमध्ये आता 'इंडिया' नाही 'भारत'च!

NCERT: एनसीईआरटीने एक मोठा निर्णय घेतला असून पुस्तकांमध्ये इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उल्लेख असणार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने काही ना काही बदल करत असते. कधी अभ्यासक्रमात काहीतरी समाविष्ट केले जाते तर कधी हटवले जाते. आता एनसीईआरटीने एक मोठा निर्णय घेतला असून पुस्तकांमध्ये इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उल्लेख असणार आहे. एनसीईआरटीने याला मंजुरी दिली आहे. यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकाने अलिकडेच इंडिया ऐवजी भारत शब्द वापरण्यावर जोर दिला होता. जी-२० परिषदेतही भारत असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती. मात्र, केंद्र सरकाने या टीकेला दाद न देता भारत असा उल्लेख करण्यास सुरुवात केली त्याची सुरुवात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आपल्या पाठ्यपुस्तकांपासून झाली आहे.

या आधीही मोठे बदल

२०२२ मध्ये एनसीईआरटीने मोठा निर्णय घेताना अभ्यासक्रमातून ३३ टक्के भाग वगळला होता. यामध्ये गुजरात दंगल, मुगल कोर्ट, आणीबाणी, शीतयुद्ध, नक्षलवादी चळवळीसारखे विषय हटवण्यात आले होते. एनसीईआरटीने याबात भूमिका स्पष्ट करताना, वगळण्यात आलेल्या विषयांच्या जागी नविन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये जीएसटी, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT