Naxal Encounter Saam Tv
देश विदेश

Naxal Encounter: नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxal Encounter In Bijapur: बिजापूरमध्ये नक्षलवादाच्याविरुद्धात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय.

Bharat Jadhav

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने चकमक घडत आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. सकाळी आठ वाजेपासून चालू असलेल्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून सुरक्षा दलाने त्यांचे मृतदेह देखील जप्त केली आहेत.

जिल्हा राखीव रक्षक (DRG), स्पेशल टास्क फोर्स (STF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या बटालियन क्रमांक 222 आणि CRPF च्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन (CoBRA) च्या 202 व्या बटालियनच्या संयुक्त ऑपरेशननंतर ही चकमक झाली. बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या चकमकीला दुजोरा दिलाय. मागील महिन्यापासून छत्तीसगडमध्ये झालेल्या विविध चकमकीत एकूण ४८ माओवादी मारले गेलेत.

यात ताज्या चकमकीचा समावेश आहे. नक्षलविरोधी मोहिमे अंतर्गत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे. दरम्यान मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्याचा नायनाट केला जाईल, असं विधान केलं होतं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या अॅक्शननंतर सुरक्षा दलाने आपल्या कारवाईला सुरूवात केली. गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते.

सुरक्षा दलांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. मागील महिन्यातही बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली होती सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता.

पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली होती. बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केलीय. तेलंगणाच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये ही कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT