President Gallantry Award: नक्षलवादी ते पोलीस निरीक्षक, तीनदा मिळवलं राष्ट्रपती वीरता पदक; वाचा संजय पोटाम यांची शौर्यगाथा

Naxal To Police Inspector Awarded Three Time President Gallantry Award: मुख्य प्रवाहात आलेल्या आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक मिळाले आहे
President Gallantry Award
Naxal To Police Inspector Awarded Three Time President Gallantry Award:Saam Tv
Published On

एक नक्षलवाद्याचं तीनदा राष्ट्रपती वीरता पदक देऊन गौरव करण्यात आल्याच म्हटलं तर सर्वांसमोर प्रश्नचिन्ह पडला असेल. पण तुम्हाला माहितीये नक्षलवादी संघटना सोडून पोलिसांना शरण आलेल्या एका व्यक्तीने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर तब्बल तीनवेळा राष्ट्रपती वीरता पदक मिळवलंय. या व्यक्तींचं नाव आहे. संजय पोटाम.

संजय पोटाम यांचा राष्ट्रपती वीरता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्याला तीन वेळा राष्ट्रपती वीरता पदक मिळेल, असं कधीच कोणाला वाटलं नसेल. पण मुख्य प्रवाहात आल्यानंतर संजय पोटाम यांनी आपल्या कामगिरीच्या साहाय्याने तीनवेळा राष्ट्रपती वीरता पदक मिळवलंय. दरम्यान सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे नक्षलवाद उत्पन्न झाला. मध्य भारतातील अनेक भागात नक्षलवादी आहेत.

President Gallantry Award
Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, दोन वेळा UPSC क्रॅक, दिव्या शक्ती यांचा प्रेरणादायी प्रवास

देशातील ११ राज्यातील ९० जिल्ह्यांत नक्षल चळवळ पसरली आहे असं प्रशासनाचं मत आहे. स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिलं नाही अशा लोकांच्या हक्कासाठी, आपण लढत असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात येतं. परंतु ते हिंसक कृत्य करत सरकारवर दबाव बनवत असतात. संजय साटमही अशाच एका ग्रुपमधील सक्रीय सदस्य होते. मात्र पोलिसांना शरण येत त्यांनी नवीन जीवन सुरू केलं आणि आज त्यांचा सन्मान होत आहे. पोटाम दंतेवाडा येथील नक्षलवाद्यांच्या ग्रुपमध्ये सक्रीय होते.

छत्तीसगढमधील दंतेवाडात संजय पोटाम आधी नक्षलवादी होते. त्यावेळी नक्षलवादी चळवळीत असताना त्यांचे नाव बदरू असं होतं. पुढे त्यांनी नक्षलवादी चवळवळ सोडून २०१३ मध्ये दंतेवाडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांसाठी गुप्त पोलीस म्हणून काम केलं. ते आता दंतेवाडा जिल्ह्यात डीआरजी टीममध्ये कार्यरत आहेत. संजय पोटाम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दंतेवाडा पोलिसांनी अनेक नक्षलविरोधी मोहिमांत यश मिळवलंय.

President Gallantry Award
Presidents Medal: ड्रग्स प्रकरण ते पोर्श अपघाताचा तपास; पुण्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबेंचा राष्ट्रपती पदकाने होणार सन्मान, जाणून घ्या तांबेंची कारकीर्द

याचमुळे संजय पोटाम यांना सातत्याने सेवेत बढती मिळत गेली आणि आता ते पोलीस निरीक्षक बनलेत. त्यांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तर काही नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलंय. त्यांच्या या कामगिरीचा यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती वीरता पदक देऊन गौरव करण्यात आला. आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक पुन्हा त्यांचा गौरव करण्यात आलाय. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय आणि एएसपी आरके बर्मन म्हणाले की, 'यावेळी प्रजासत्ताक दिन दंतेवाडा पोलिसांसाठी खूप अभिमानास्पद आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ९ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती वीरता पदकाने सन्मानित केले जाणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com