Currency Note Press Strike Saam Tv
देश विदेश

Currency Note Press Strike : देभरात नोटांचा तुटवडा पडणार, नेमकं काय आहे कारण? समोर आली महत्त्वाची माहिती

Currency Note Press India : नाशिकसह देशातील ९ करन्सी आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलै रोजी संपावर जाणार आहेत. यामुळे चलनी नोटा, पासपोर्ट, मुद्रांक व निवडणूक साहित्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Alisha Khedekar

देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार विविध मागण्यांसाठी ३१ जुलै रोजी संपावर जाणार असल्याची बातमी समोर आले आहे. यामुळे देशभरात चलनी नोटांसह पासपोर्ट, मुद्रांक आणि निवडणूक सामग्रीचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

येत्या ३१ जुलै रोजी नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील ९ करन्सी युनिट्स आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांनी संपाचा इशारा दिला आहे. दिवाळी बोनस, मयत कामगारांच्या वारसांना नोकरीवर घेणं, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, मेडिकल सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी कामगारांनी संपाचा इशारा दिला आहे.

अशी माहिती इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली. दरम्यान इंडिया सिक्युरिटी प्रेस संपावर गेल्यास मोठ्या प्रमाणावर चलनी नोटांसह पासपोर्ट, मुद्रांक आणि निवडणूक सामग्रीचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता इंडिया सिक्युरिटी प्रेसने वर्तवली आहे. दरम्यान सरकार कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT