Super El Nino Saam Tv
देश विदेश

Super El Nino: चिंता वाढली! जगावर 'सुपर एल निनो'चं महासंकट, NASAचा धडकी भरवणारा फोटो; भारतावर काय परिणाम होणार?

Climate Alert: जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे. जगावर 'सुपर एल निनो'चं महासंकट आहे. नासाकडून धडकी भरवणारा फोटो समोर आला आहे.

Priya More
  • NASA च्या सॅटेलाइट फोटोमुळे सुपर एल निनोची शक्यता वाढली

  • पॅसिफिक महासागरातील तापमान झपाट्याने वाढत आहे

  • भारताच्या मान्सूनवर आणि शेतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो

  • उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि हवामानातील अस्थिरता वाढू शकते

जगावर एक नवं संकट येण्याची शक्यता आहे. ‘सुपर एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे जगभरात हवामान बदलाची चिंता वाढली आहे. पॅसिफिक महासागरात एक शक्तिशाली एल निनो वेगाने तयार होत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या सॅटेलाइट फोटोमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे.

पॅसिफिक महासागरातील तापमान वाढ आणि बदलती हवामान परिस्थिती अधिक स्पष्ट होत असल्याचे या फोटोच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांतील मान्सून, उष्णतेची लाट, दुष्काळ आणि शेतीवर होऊ शकतो. नेमकं ‘सुपर एल निनो’ म्हणजे काय, NASAच्या फोटोमधून कोणता इशारा मिळतोय आणि भारतावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत...

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या एका उपग्रहाने एका प्रचंड उष्णतेच्या लाटेचा फोटो काढला आहे. ज्यामध्ये समुद्राची पातळी वाढल्याचे दिस आहे. नासाच्या सेंटिनेल-६ मायकेल फ्रेलिच उपग्रहाच्या नवीन माहितीनुसार, पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय प्रदेशात पाण्याची पातळी नेहमीपेक्षा जास्त आहे. यावरून असे सूचित होते की, समुद्राच्या पृष्ठभागाखाली मोठ्या प्रमाणात गरम पाणी साठत आहे.

पॅसिफिक महासागराच्या काही भागांतील सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि त्यामुळे वाढणारी समुद्राची पातळी यांचा संबंध एल निनोशी आहे. अमेरिकेच्या सागरी आणि वातावरणीय प्रशासनाने ११ जून रोजीच एल निनोची घोषणा केली होती. त्यानंतर नासाकडून हे फोटो समोर आल्यानंतर वास्तव समोर आले आहे. समुद्राच्या पातळीतील वाढ होत असल्याची माहिती समुद्राच्या पृष्ठभागाखाली किती उष्णता साठलेली आहे हे उघड करू शकते. गरम पाण्याच्या प्रसरणामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होते.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधील संशोधकांनी सांगितले की, पश्चिम पॅसिफिकमध्ये दिसून येणारी परिस्थिती १९९७ साली अनुभवलेल्या परिस्थितीशी खूपच मिळती जुळती आहे. त्यावर्षी आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वात शक्तिशाली एल निनोंपैकी एक जो 'गॉडझिला एल निनो' म्हणून ओळखला जातो. शास्त्रज्ञांच्या मते, हा एल निनो अधिक तीव्र होत आहे. तो गेल्या अनेक दशकांतील सर्वात शक्तिशाली ठरू शकतो असे सांगितले जात आहे.

या एल निनोबाबत गंभीर इशारे देण्यात आले आहेत. जागतिक हवामान संघटनेने आधीच सांगितले होते की, सरासरीपेक्षा जास्त तापमान जगाच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये पसरेल. हा एल निनो गेल्या १५० वर्षांतील सर्वात तीव्र मानला जात आहे. यामुळे जगाच्या प्रत्येक भागात उष्णता वाढेल आणि पावसाळ्यावर परिणाम होईल. भारतात आधीच उष्णतेची लाट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या अभावामुळे ४ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरील भार वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT