नरसिंहपूर जिल्ह्यातील पोलिसांनी एका रहस्यमय हत्येचा उलगडा करत अवैध संबंध आणि ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. या प्रकरणात मृताच्या मेहुणीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात उघड झाले की विवाहित महिलेला सोशल मीडिया पाहत हत्या करण्याची आयडिया सुचली आणि तिने भावोजीला मारण्याचा कट रचला.
२५ ऑक्टोबर रोजी जलशा हॉटेलजवळून सृजन साहू बेपत्ता झाला होता. तक्रार आल्यानंतर मुगवानी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासासाठी नेमलेल्या तिन्ही विशेष पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे कारवाई केली. तपासात असे समोर आले की, आरोपींनी सृजनला जंगलात घेऊन जाऊन त्याची चाकूने मारुन हत्या केला आणि त्याचा मृतदेह दगडांच्या खाली लपवला.
चौकशीत निधीने कबुली दिली की तिचे भावजी सृजनसोबत अवैध संबंध होते आणि लग्नानंतरही तो जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता. पाच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं आणि तिला या नात्यातून सुटका मिळावी अशी त्यांची इच्छा होती. पोलिसांच्या मते महिलेने सोशल मीडियावरील रील्स आणि कल्पना पाहून त्याची हत्या करण्याचा कट रचला.
निधीने खुनासाठी दोन चाकू विकत घेतले आणि ते पलंगाखाली लपवले. त्यानंतर तिने साहिलला ₹५०,००० सृजनला मारण्यासाठी कामावर ठेवले होते. त्याला ₹१०,००० आधी दिले आणि नंतर सोन्याचे कानातले देण्याचे आश्वासनही दिले.
२५ ऑक्टोबरच्या दुपारी निधीने सृजनला बाहेर फिरायला जाऊ असे बोलून गाडी चालवायला बोलावले. ते दोघे शिफ्ट कारने जंगलाच्या दिशेने गेले. सृजनने विचारले आपण कुठे जात आहोत? तेव्हा साहिल बोलला कि पुढे अजून एक व्यक्ती भेटणार आहे. गाडी चालवत असताना निधीने अचानक त्याच्या मानेवर चाकूने तीन वेळा वार केले आणि साहिलनेही चाकूने हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी सृजनचा मृतदेह जंगलात दगडाखाली पुरला.
पोलिस अधीक्षक डॉ. ऋषिकेश मीणा यांनी सांगितले की, तपासादरम्यान श्वान पथकाच्या मदतीने जंगलातून मृतदेह आणि वापरलेले चाकू जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी निधी साहू, साहिल आणि अल्पवयीन मुलगा ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्य उघड करण्यात यशस्वी झालेल्या पोलिस पथकाला डॉ. मीणा यांनी ₹१०,००० चे बक्षीस जाहीर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.