Rahul Gandhi On NDA Government Saam Tv
देश विदेश

VIDEO: NDA सरकार कोसळणार? राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

Rahul Gandhi On NDA Government: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन महिनाही उलटला नाही. तोच आता सरकार पाडापाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात राहुल गांधींनी मोठं वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन होऊन महिनाही उलटला नाही.तोच सरकार पाडापाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी पहिल्याच बैठकीत इंडिया आघाडी योग्य वेळी सरकार स्थापन करण्याबाबत निर्णय घेईल, असं वक्तव्य केलं होतं.

मात्र आता राहुल गांधींनी त्यांच्या दोन पाऊल पुढं जात एनडीएमध्ये मोठा असंतोष असून अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे एनडीए सरकार कोसळणार असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केलाय.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी म्हणाल की, एनडीए सरकारमधील घटकपक्षांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे हे सरकार कधीही कोसळू शकतं. एनडीए सरकारमधील अनेकजण संपर्कात आहेत. मोदींना अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सध्या भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक केली नसती तर इंडियाचं बहुमत आलं असतं, असाही दावा राहुल गांधींनी केलाय.

एनडीएचं सरकार नितीश बाबू आणि चंद्रबाबूंच्या टेकूवर उभं आहे. त्यातच नितीश कुमार यांची देशाच्या राजकारणात पलटूराम अशी असलेली ओळख आणि चंद्रबाबूंनी आधी मोदींवर केलेली टीका आणि त्यानंतर मोदींसोबत जुळवून घेतल्यामुळे ते एनडीए सरकारमधून कधीही बाहेर पडण्याची चर्चा वारंवार रंगते.

त्यातच मल्लिकार्जून खर्गेंनी निकालानंतर सत्ता स्थापनेचे दिलेले संकेत आणि राहुल गांधींनी मुलाखतीत केलेला दावा, यामुळे पुन्हा एकदा एनडीए सरकार अस्थिर असल्याचा चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे पून्हा एकदा राजकीय भूकंप घडून इंडिया आघाडी सत्तेत येणार की मोदी आपली 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT