India PM and President Saam TV
देश विदेश

India PM Oath Ceremony: नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; निमंत्रण पत्रिका आली समोर

India PM Oath Ceremony Invitation Card: नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

Satish Daud

नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. मोदींच्या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या ५ तुकड्या तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो आणि ड्रोन तसेच 'स्नायपर्स' तैनात करण्यात आले आहेत. शपथविधी समारंभाला येणाऱ्या परदेशी पाहुण्यासाठी दिल्लीतील अलिशान हॉटेल्समध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज, ओबेरॉय, क्लेरिजेस, लीला, आयटीसी मौर्य, हॉटेल्समध्ये परदेशी पाहुणे थांबणार आहेत.यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी एनएसजी कमांडो तैनात असणार आहे. बाहेरील घेऱ्यातही दिल्ली पोलिसांतील जवान चोख बंदोबस्त ठेवणार आहे.

India PM Oath Ceremony

मोदींच्या शपथविधीसाठी कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती?

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) २९१ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. यामध्ये भाजपच्या २४० जागांचा समावेश आहे. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने देखील या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलीच टक्कर दिली आहे. २४३ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT