Narendra Modi oath taking ceremony  Saam Tv
देश विदेश

Modi Oath Ceremony LIVE: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान! नितीन गडकरी यांच्यासह या नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

Narendra Modi oath taking ceremony: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.

Satish Kengar

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिले नेते आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर अमित शाह आणि चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदीजींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि बिहारच्या विकासाला पूर्ण सहकार्य मिळेल.''

कोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात मिळाले स्थान

मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, डॉ. एस. जयशंकर, मनोहर लाल, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जितन राम मांझी, राजीव यांचा समावेश होता. रंजन सिंग, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओरांव, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ.मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी.आर. पाटील यांचा समावेश आहे.

या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखर, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, भूतानच्या पंतप्रधान शेरिंग तोबगे, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यासहअनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT