These Union Ministers Likely To Have Been Dropped From Modi 3.0 Cabinet Saam Tv
देश विदेश

Modi Cabinet 2024: नारायण राणे ते स्मृती इराणी; PM मोदींच्या नवीन मंत्रिमंडळातून या मंत्र्यांचा पत्ता कट

Narendra Modi 3.0 New Cabinet Updated: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कॅबिनेट मंत्रीही शपथ घेणार आहेत. मात्र यावेळी काही मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.

Satish Kengar

आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कॅबिनेट मंत्रीही शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन आणि मनसुख मांडविया यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची जागा नव्या सरकारमध्ये निश्चित मानली जात आहे.

मात्र यावेळी मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये समावेश नसलेल्या चेहऱ्यांची यादी धक्कादायक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी नारायण राणे ते स्मृती इराणी यांसारख्या दिग्गज नेत्यांना मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या दिग्गजांमध्ये, नारायण राणे, भागवत कराड, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भरती पवार, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, अजय भट्ट, जनरल व्हीके सिंग, राजकुमार रंजन सिंग, अर्जुन मुंडा, आरके सिंग, राजीव चंद्रशेखर, निशीथ प्रमाणिक, अजय मिश्रा टेनी, सुभाष सरकार, जॉन बारला, स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.

नवीन मंत्रिमंडळात या खासदारांना मिळाली संधी

शिवसेनेचे प्रतापराव जाधव, भाजपचे गुजरात युनिटचे अध्यक्ष सीआर पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया, राव इंद्रजित सिंग, नित्यानंद राय, भगीरथ चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांना मंदीच्या नवीन मंत्रिमंडात संधी मिळणार आहे. या सर्वांनी रविवारी चहापानावर मोदींची भेट घेतली. 2014 पासून, अशी परंपरा बनली आहे की मंत्रिमंडळ स्थापनेआदी मोदी नेत्यांना चहासाठी बोलावतात आणि नंतर कमी-अधिक प्रमाणात तेच चेहरे मंत्रीपदाची शपथ घेतात.

राज्यातील रक्षा खडसे आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार जितिन प्रसाद हेही नव्या सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. सरकारमध्ये सहभागी होण्याचा फोन आल्याच्या वृत्ताला खडसे यांनी दुजोरा दिला. सीतारामन, सर्बानंद सोनोवाल आणि किरेन रिजिजू हे देखील शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT