Vande Bharat Saam Tv
देश विदेश

Vande Bharat train : चेन्नईसाठी नवी वंदे भारत ट्रेन, कुठे थांबणार? वाचा तिकिटाची किंमत

Vande Bharat Express Update News : नरसापूर–चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसची व्यावसायिक सेवा सुरू झाली आहे. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १२ तासांवरून ८.५५ तासांपर्यंत कमी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Narasapur-Chennai Vande Bharat Express : नरसापूर ते चेन्नई या मार्गावर आजपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ​ही व्यावसायिक सेवा असेल असे भारतीय रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चेन्नई ते नरसापूर ही सेवा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे चेन्नई आणि नरसापूर या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. दोन शहरातील प्रवास आरामदायी अन् वेगात होईल.

२०६७७ एमजीआर चेन्नई सेंट्रल - विजयवाडा ही वंदे भारत एक्सप्रेस आता नरसापूरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. १७ डिसेंबरपासून चेन्नईमधून ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे, असे दक्षिण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तर ट्रेन क्रमांक २०६७८ विजयवाडा ते डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस आजपासून नरसापूरपासून सुटणार आहे. या ट्रेनचा विस्तार करण्यात आला आहे. मंगळवार वगळून आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे.

नरसापूर ते चेन्नई हे अंतर जवळपास ६५५ किमी इतके आहे. सध्या या प्रवासासाठी १२ ते १३ तास लागतात. पण वंदे भारत एक्सप्रेसमुळे हे अंतर ८.५५ तासात पूर्ण होईल. नरसापूरमधील लोकांना चेन्नईला जाण्यासाठी आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळाला आहे. शिक्षण, व्यापार अन् पर्यटनाला या वंदे भारत एक्सप्रेसमुळे चालना मिळेल.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?

डॉ एमजीआर चेन्नई सेंट्रल आणि नरसापूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सात स्थानकावर थांबेल. सेमी-हाय-स्पीड ट्रेनला रेनिगुंटा जंक्शन, नेल्लोर, ओंगोल, तेनाली जंक्शन, विजयवाडा जंक्शन, गुडीवाडा जंक्शन आणि भीमावरम टाउन असे थांबे असतील.

वंदे भारतचे वेळापत्रक काय?

नरसापूरला निघणारी वंदे भारत एक्सप्रेस चेन्नईहून सकाळी ०५:३० वाजता निघेल आणि नरसापूर येथे दुपारी दोन वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासाला ही ट्रेन नरसापूरहून १४:५० वाजता निघेल आणि चेन्नईला २३:४५ वाजता पोहोचेल.

नरसापूर -चेन्नई वंदे भारत ट्रेन तिकीट किती?

नरसापूर ते चेन्नई दरम्यान एसी चेअर कारने प्रवास करण्यासाठी तिकिटाची किंमत १६३५ रुपये इतकी आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ३०३० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT