Municipal Elections : शिंदेसेनेत 'पुत्र'संघर्षाचा अध्याय, आजी-माजी आमदारांमध्ये वाद उफळणार?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुलमंडी प्रभागातील उमेदवारीवरून आमदार आणि माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
 Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुलमंडी प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश आणि तनवाणी यांचा मुलगा चंद्रकांत या दोघांनाही याच प्रभागातून तिकीट हवे आहे. या 'पुत्र'संघर्षाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये गुलमंडी प्रभागातील खुल्या पुरुष प्रवर्गात आपापल्या मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या दोघांत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. गुलमंडी प्रभागातून शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि आमदार प्रदीप जैस्वाल या दोघांचीही मुले निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यावरून या दोघांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे.

 Eknath Shinde
KDMC News : निशाणा बरोबर लागेल! महापालिका निवडणुकीआधीच वातावरण 'बिघडलं'; शिंदेंचा नेम नेमका कुणावर?

मैत्रीसाठी मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जैस्वाल यांच्यासाठी शेवटच्या क्षणी उद्धव सेनेकडून किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली होती. आता महापालिका निवडणुकीत तनवाणी यांच्या मुलासाठी आमदार जैस्वाल हे गुलमंडी प्रभाग सोडतात का? हे पाहावं लागेल. सध्या मात्र दोघांनीही गुलमंडी प्रभागातून दावा केलाय. तनवाणी यांना त्यांचे चिरंजीव चंद्रकांत किंवा याच वॉर्डात नगरसेवक राहिलेले त्यांचे भाऊ राजू तनवाणी यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. त्याच ठिकाणी आमदार जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल हे इच्छुक आहेत. संभाजीनगरमध्ये गुलमंडी प्रभाग सध्या चर्चेत आहे.

 Eknath Shinde
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीचा बार उडणार! आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद?

संभाजीनगरात जागा वाटपावरून ठिणगी -

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जागा वाटपावरून आताच ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगरात छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याची आता चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपकडून जवळपास दोन हजार इच्छुक आहेत. एकूण २९ प्रभाग आहेत. सहा ते सात प्रभाग हे मुस्लिम बहुल आहेत. त्यामुळे 22 ते 23 प्रभागातच शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे केवळ 88 ते 92 जागा या दोन्ही पक्षाकडे असतील. आतील किती जागा शिवसेनेला आणि किती जागा भाजपला मिळणार यावरून आता दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

 Eknath Shinde
Terrorist Attack : सिडनी दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन, बाप-लेकाने अंधाधुंद गोळ्या झाडल्या, १६ जणांचा मृत्यू

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि मोठा भाऊ म्हणून गणला जाणाऱ्या शिवसेनेला यावेळेस मोठा भाऊची भूमिका बजावावी लागेल की छोटा भाऊ याची चर्चा सुरू झालेली आहे. भाजपने आपल्या शहरांमध्ये संघटनात्मक बांधणी मोठी झाल्याचा दावा केला आहे. २०१५ मध्ये शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले होते, तर ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या ३८ जागांवर दावा केला जाईल. भाजपचे २३ नगरसेवक वगळून उरलेल्या जागांचे वाटप करावे हे सूत्र शिवसेना मांडणार असल्याचे मानले जाते. त्यात आता फिफ्टी-फिफ्टी असा फॉर्मुला चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

 Eknath Shinde
मुंबईत मोठा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंना होमग्राऊंडवर धक्का, दिग्गज महिला नेत्या भाजपचं कमळ घेणार हातात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com