Ghaziabad Namo Bharat Train Viral Video Saam Tv
देश विदेश

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Ghaziabad Namo Bharat Train Viral Video: नमो भारत रॅपिड ट्रेनमध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवले. त्यांचा शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झोला होता. या घटनेनंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Priya More

Summary:

  • नमो भारत रॅपिड ट्रेनमध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवले

  • धावत्या ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवलेल्या तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

  • या घटनेनंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला

  • तरुण-तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्या ट्रेन ऑपरेटरची नोकरी गेली

नमो भारत रॅपिड ट्रेनमध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ट्रेन ऑपरेटरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंतेत येऊन तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले.

ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तरुणीवर उपचार करून तिच्या कुटुंबीयांनी तिला नातेवाईकांच्या घरी पाठवून दिले. व्हिडीओत दिसणारी तरुणी गाझियाबादची राहणारी असून ती महाविद्यालयात शिक्षण घेते. ती मेरठ रोडवरील एका इंस्टीट्यूटमध्ये बीसीएचे शिक्षण घेते. तर व्हिडीओमध्ये दिसलेला तरुण गाझियाबादच्या एका कॉलेजमध्ये बीटेकचे शिक्षण घेत आहे. दोघेही एकाच समुदायातील आहेत. तरुण आणि तरुणीच्या घरामध्ये ३ किलोमीटरचे अंतर आहे.

२४ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता नमो भारत ट्रेनच्या प्रीमियम कोच-२३ मध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवले होते. हे दोघे दुहाईवरून मुरादनगरच्या दिशेने जात होते. अश्लिल कृत्य करणाऱ्या तरुण-तरुणीविरोधात मुरादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या दोघांचा शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ट्रेन ऑपरेटरविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ऑपरेटरने कोणतिही परवानगी न घेता ट्रेनमध्ये मोबाइलचा वापर केला आणि कंपनीच्या नियमाचे उल्लंघन केले.

व्हायरल होणारा व्हिडीओ २४ नोव्हेंबरचा आहे. मेरठ ते मोदीनगर स्थानकादरम्यान तरुण तरुणीने शरीरसंबंध ठेवले. तरुणी कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये होती. तिच्या ड्रेसवर कॉलेजचा लोगो होता. तिने गळ्यात आयकार्ड देखील घातले होते. तर तरुणाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांची खूप बदनामी झाली. त्यांच्या आजूबाजूला राहणारी लोकं सतत त्यांच्या घराकडे पाहत जातात त्यामुळे ते घराचा दरवाजा बंद ठेवतात. ते म्हणतात आमच्या मुलीची चूक आहे यात आम्ही काय करणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Skin Care: थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT