UP Accident News 
देश विदेश

Nagpur : गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

हरेराम त्रिपाठी नागपूर येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरु होते. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात सकाळी साडेसहा वाजता अपघात झाला.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात भयंकर अपघात

  • नागपूरमधील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु हरेराम त्रिपाठी व पत्नी ठार

  • इनोव्हा कार ट्रेलरला धडकली; कारचा चुराडा झाला

  • गावी जाताना घडलेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त

UP Accident News : नागपूरमधील कविकुल गुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरु हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी यांच्या इनोव्हा कारचा भयंकर अपघात झाला. बिहारमध्ये आपल्या मूळ गावी जात असताना उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यात काळाने घाला घातला. कुटुंबाला भेटण्यासाठी गावी जात असताना आज सकाळी अपघातात निधन झाले. अपघात इतका भयंकर होता की एअरबॅग असतानाही दोघांचा जीव गेला. आज सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला आहे. हरेराम त्रिपाठी हे रामटेकहून त्यांच्या मूळगावी जात होते. त्यावेळी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यात हरेराम त्रिपाठी यांच्या इनोव्हा कारचा भयंकर अपघात झाला. सकाळी इनोव्हा कार रस्त्यावर असलेल्या ट्रेलरला जाऊन जोरात धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. एअरबॅग असतानाही त्रिपाठी दाम्पत्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. अपघातामधील जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तर त्रिपाठी दाम्पत्याचा मृतदेह पोस्टमार्टमासाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे.

अपघातात जखमी झालेल्या वैभवने पोलिसांना सांगितले की, अपघातात मृत्यू झालेले हरेराम त्रिपाठी हे नागपूरमधील एका विद्यापीठाच्या व्हाइस चान्सलर पदावर होते. हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नीला घेऊन वैभव नागपूरहून गोपालगंजला परतत होता. सकाळी डोळ्यावर खूप झोप होती, याबाबत हरेराम त्रिपाठींना सांगितले. तेव्हा ते स्वतः गाडी चालवू लागले. बशारथपूरजवळ चाक पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रेलरला इनोव्हा कारची जोरदार धडक झाली. या अपघातात गाडी चालवणाऱ्या हरेराम आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Masala Pav : गरमागरम चहा अन् चटपटीत चीजी मसाला पाव, संध्याकाळच्या नाश्त्याचा परफेक्ट बेत

Maharashtra Live News Update: - परभणीच्या राणीसावरगाव ग्राम पंचायत ग्रामसभेत गोधळ हाणामारी

Horoscope Sunday : कुटुंबासाठी तडजोड करावी लागेल, ५ राशींसाठी भाग्याचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास होणार सोयीस्कर; मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

गणेशोत्सवात ३८० स्पेशल ट्रेन; पनवेल-चिपळूण दरम्यान धावणाऱ्या ६ ट्रेन कुठे-कुठे थांबणार? वाचा

SCROLL FOR NEXT