China News  Saam TV
देश विदेश

China Pneumonia : चीनमध्ये रहस्यमय आजाराचा कहर; जगाची चिंता पुन्हा वाढली, भारताला किती धोका?

China Outbreaks : आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांची बालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना देखील चीनमधील या आजारावर लक्ष ठेवून आहे.

साम टिव्ही ब्युरो

China News :

चीनने पुन्हा एकदा जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. निमोनियासदृष रहस्यमय आजाराचा चीनमध्ये सध्या कहर सुरु आहे. या आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांची बालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना देखील चीनमधील या आजारावर लक्ष ठेवून आहे.

चीनमधील सध्याची स्थिती कोरोना काळाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून आरोग्य अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. लहान मुलांना होणाऱ्या या आजाराबाबत WHOनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने या महिन्याच्या सुरुवातीला सादर केलेल्या अहवालात म्हटलं की, इन्फ्लूएंझा आणि सामान्य बॅक्टेरियाच्या संसर्गाचा प्रसार, म्हणजे कोविड-19 उपाय हटवल्यामुळे, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियासह लहान मुलांवर परिणाम करणारे श्वसनाचे आजार वाढले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजाराची लक्षणे

मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे. उच्च तापासह अनेक असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय नाक वाहणे, खोकला, एसओबी, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. इन्फ्लूएंझा व्हायरस, एन्टरोव्हायरस, राइनोव्हायरस आणि कोविड व्हायरससारखे अनेक विषाणू आहेत ज्यामुळे अशी लक्षणे उद्भवू शकतात.

भारताला धोका आहे का?

भारताचा शेजारी असलेल्या चीनमधील या स्थितीची आपल्याला किती धोका आहे, हे आताच सांगणे थोडे कठीण आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते यावर त्वरित उपचाराची गरज आहे. सुरुवातीचे जे अहवाल येत आहेत त्यानुसार हा रोग अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. त्यामुळे कोरोनासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचं आहे. सध्यातरी भारताला यातून फार धोका दिसत नाही. मात्र खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

Maharashtra Politics : आमची लोक वाघाची शिकार करायची, आता...; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

SCROLL FOR NEXT